ETV Bharat / bharat

भारतीय नौदलात रचला इतिहास, शिवांगी स्वरुप बनल्या पहिल्या महिला पायलट

author img

By

Published : Dec 2, 2019, 7:30 PM IST

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पायलट म्हणून शिवांगी स्वरुप यांचा समावेश करण्यात आला आहे. सब लेफ्टनंट शिवांगी या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या आहेत.

भारतीय नौदलात रचला गेला इतिहास,
भारतीय नौदलात रचला गेला इतिहास,

कोची - पुरुषांचे वर्चस्व असलेल्या भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पायलट म्हणून शिवांगी स्वरुप यांचा समावेश करण्यात आला आहे. सब लेफ्टनंट शिवांगी या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या आहेत.

भारतीय नौदलात रचला गेला इतिहास...

बिहारमधील मुझफ्फरापूर तेथे जन्मलेल्या शिवांगी कोची येथील नौदलाच्या तळावर सध्या कार्यरत आहेत. नौदल दिनाच्या आधीच दोन दिवस आधी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मी या क्षणाची कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते. माझ्यासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे, अशी भावना शिवांगी यांनी व्यक्त केली.

First woman pilot of Indian Navy
शिवांगी स्वरुप बनल्या पहिल्या महिला पायलट...

नौदलात महिलांना पायलट म्हणून घेण्यासाठी २०१५ मध्येच मंजुरी देण्यात आली होती. डोर्निअर सर्विलांस हे विमान शिवांगी चालवणार आहेत. या विमानामध्ये अॅडव्हान्स सर्व्हिलान्स, रडार, नेटवर्किंग व इलेक्ट्रॉनिक सेन्सर बसवलेले असतात. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.