ETV Bharat / bharat

वंदे भारत मिशन: युएईत अडकलेल्या नागरिकांना घेऊन एअर इंडियाची दोन विमाने केरळात दाखल - एअर इंडिया बातमी

भारतात आणलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यातील नागरिक असतील तेथे त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 8, 2020, 8:35 AM IST

तिरुवअनंतपूरम - विदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. त्याअंतर्गत एअर इंडियाचे पहिले विमान १७७ प्रवाशांना अबुधाबीतून घेऊन आले आहे. काल(गुरुवार) रात्री १०.०९ मिनिटांनी विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

दोन फ्लाईट भारतात पोहचल्या

एअर इंडिया एक्सप्रेस IX ४५२ फ्लाईट १७७ प्रवासी आणि चार लहान मुलांना घेऊन भारतात आली. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने याबाबत माहीती दिली. तर एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट IX ३४४ त्यानंतर काही वेळातच कोझीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. हे विमान दुबईवरून १७७ प्रवासी आणि ५ लहान मुलांना घेऊन भारतात आले.

सर्वांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात येणार

भारतात आणलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यातील नागरिक असतील तेथे त्यांची क्वारंटाईनची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.