ETV Bharat / bharat

बहुप्रतीक्षित राफेल आज भारतात होणार दाखल ; हवाई दल प्रमुख स्वतः उपस्थित राहणार - Ambala

भारतासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून देशाची हवाई मारक क्षमता वाढवणारे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल लढाऊ विमाने आज दाखल होणार आहेत.

राफेल
राफेल
author img

By

Published : Jul 29, 2020, 9:21 AM IST

नवी दिल्ली - भारतासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून देशाची हवाई मारक क्षमता वाढवणारे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल लढाऊ विमाने आज दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 27 जुलैला फ्रान्सच्या मेबोर्डीऑक्स शहरातील मेरिनॅक एअरबेसवरून ही 5 विमान भारताच्या दिशेनं रवाना झाली होती.

संयुक्त अरब अमिरातीमधील अल दफरा विमानतळावर थांबली आहेत. आज सकाळी 11 च्या सुमारास ही विमाने उड्डाण करतील आणि दुपारी 2 पर्यंत अंबाला एअरबेसवर लँडिंग करतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राफेलच्या स्वागतासाठी हवाई दल प्रमुख स्वतः उपस्थित राहणार आहेत.

राफेल लढाऊ विमानांमध्ये एसएनईसीएमए मधील 2 एम 88-2 इंजिने आहेत. प्रत्येक इंजिन हे 75 केएन थ्रस्टचे आहे. तसेच राफेल लढाऊ विमाने ही हवेत इंधन भरू शकतात. ही विमाने एकमेकांना इंधने भरण्यास मदत करू शकतात. राफेल हे 100 किलोमीटर लांब असलेले शत्रूचे विमान भेदू शकते. तसेच राफेल एका वेळी 8 लक्ष्य साध्य करू शकते.

दरम्यान अंबाला येथील हवामानात खराबी झाली, तर अडचण निर्माण होईल. म्हणून जोधपूर विमानतळही लँडिंगसाठी सज्ज करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन लढाऊ विमानांच्या स्वागताची तयारी जोधपूर विमानतळावरही करण्यात आली आहे.

सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतांना बळकट करण्यासाठी भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल विमाने 59,000 कोटींना खरेदी करण्याचा करार केला होता. राफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी ही अंबाला हवाई दल तळावर तैनात केली जाईल. या भारतीय हवाई दलाचा तळ हा भारत-पाकिस्तान सीमेरेषेपासून 200 किमी अंतरावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.