नवी दिल्ली - नरेला भागातील दोन कारखान्यांमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्नीशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बूट आणि प्लास्टिक कारखान्यामध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे.
बचावकार्य सुरू असताना झालेल्या सिलिंडरच्या स्फोटामध्ये अग्नीशामक दलाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना जवळच्या राजा हरिश्चंद्र रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीमध्ये लागलेली या महिन्यातील ही दुसरी मोठी आग आहे. आठ डिसेंबरला राणी झांसी रोडवरील अनाज मंडी येथील फॅक्ट्रीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आगीतून तब्बल 50 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कामगारांचा समावेश होता.