बंगळुरू : कर्नाटकातील एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. बंगळुरूतील बापूजी नगर येथे ही केमिकल फॅक्टरी आहे. या फॅक्टरीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला असलेली वाहनेही या आगीत जळून खाक झाली आहेत.
आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. फॅक्टरीशेजारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम पोलीस करत आहेत. तर, आजूबाजूच्या घरांमध्ये पसरत चाललेली ही आग आटोक्यात आणणे अवघड असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.