लखनौै- काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्याविरोधात हजरतगंज पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्या प्रीती वर्मा यांनी ही एफआयआर दाखल केली आहे. आक्षेपार्ह भाषा, बनावट बातम्या आणि सोशल मीडियाचा गैरवापर केल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
अलका लांबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अपशब्द वापरत ट्विट केले होते. हे लक्षात घेत प्रिती वर्मा यांनी काँग्रेस नेते अलका लांबा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
अल्का लांबाने ज्या प्रकारे सोशल मीडियावर अपशब्द वापरुन ट्विट केले. त्याचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होईल. सध्या सोशल मीडिया मोठ्या संख्येने मुले हाताळत आहेत. सोशल मीडियावरील अशा पोस्टमुळे मुलांचे मानसिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अलका लांबाविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचे प्रीती वर्मा यांनी सांगितले