लखनौ - राजधानी दिल्लीमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमाचे प्रमुख मौलाना साद यांच्या चार नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मार्चनंतर मरकज कार्यक्रमाला हजेरी लावल्याबाबतची माहिती उघड करत नसल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सतत आवाहन केल्यानंतरही त्यांनी पोलिसांना माहिती दिली नाही, असे सहारनपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
राजधानी दिल्लीतील मरकज निजामुद्दीन येथे मार्च महिन्यात तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाला विदेशातूनही मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. यातील अनेकांना कोरोना असल्याचे नंतर तपासणीत स्पष्ट झाले. या कार्यक्रमाला देशभरातील नागरिकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला.
तबलिगी जमात कार्यक्रमाला ज्या परदेशी नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करून हजेरी लावली होती. त्यांच्यावर कारावाई करण्यात येत आहे. पर्यटन व्हिसा असताना धार्मिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.