नवी दिल्ली - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अडचणीत सापडले आहेत. नव्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत एमएसएमई उद्यागाची व्याख्या बदलण्यात आली आहे. त्यामुळे गंतवणुक आणि उलाढाल वाढली असली तरी उद्योगांना फायदे मिळणार आहेत.
-
Definition of MSMEs has been revised, investment limit to be revised upwards, additional criteria of turnover also being introduced: Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/BHYcGWD9H2
— ANI (@ANI) May 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Definition of MSMEs has been revised, investment limit to be revised upwards, additional criteria of turnover also being introduced: Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/BHYcGWD9H2
— ANI (@ANI) May 13, 2020Definition of MSMEs has been revised, investment limit to be revised upwards, additional criteria of turnover also being introduced: Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/BHYcGWD9H2
— ANI (@ANI) May 13, 2020
लघू, सुक्ष्म मध्यम उद्योंगाची व्याख्या बदलली
- १ कोटी पर्यंतची गुंतवणूक आणि ५ कोटींपर्यंतची उलाढाल असणाऱ्या उद्योगांना सुक्ष्म उद्योग समजले जाणार
- १० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक असलेले आणि ५० कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या उद्योगांना लघू उद्योग म्हटले जाणार आहे.
- २० कोटी रुपये गुंतवणूक आणि १०० कोटींपर्यंत व्यवहार करणाऱ्या उद्योगांना मध्यम उद्योग म्हटले जाणार आहे. यामध्ये सेवा क्षेत्र आणि उद्योग या दोन्हींचा समावेश असणार आहे.
स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी २०० कोटींपर्यंतच्या टेंडरमध्ये लघू उद्योगांनाच स्थान असणार. ग्लोबल कंपन्यांना यात स्थान मिळणार नाही.
कोरोनामुळे उद्योगांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या, त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांची उत्पादने ई-मार्केटमध्येही उपलब्ध करुन दिले जातील. त्यांच्या उत्पादनांना मार्केट मिळण्यासाठी ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी कोरोनानंतर या उत्पादनांचे प्रदर्शन भरवले जाईल.