ETV Bharat / bharat

देशात कोरोनाचे 53 हजार 601 रुग्ण वाढले; मृत्यूदर दोन टक्क्यांपेक्षा कमी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर पहिल्यांदाच दोन टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगितले. देशातील कोरोना मृत्यूदर 1.99 टक्के आहे. दरम्यान, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 69.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. मंगळवारी 53 हजार 601 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.

india corona update
भारत कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 12, 2020, 4:24 AM IST

हैदराबाद- भारतात मंगळवारी 53 हजार 601 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे देशातील रुग्णसंख्या 22 लाख 68 हजार 675 वर पोहोचली आहे. 15 लाख 83 हजार 490 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. देशभरात कोरोनामुळे 45 हजार 257 रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या देशात 6 लाख 39 हजार 929 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली.

इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या माहितीनुसार 6 लाख 98 हजार 290 नमुन्यांची तपासणी सोमवारी करण्यात आली. एकूण 2.52 कोटी नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर पहिल्यांदाच 2 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगितले. देशातील कोरोना मृत्यूदर 1.99 टक्के आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 69.80 टक्क्यांवर पोहोचला आहे.

महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 553 झाली आहे. तामिळनाडू राज्यात मंगळवारी 5 हजार 834 कोरोना रुग्ण आढळले. 6 हजार 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तामिळनाडूमध्ये दिवसभरात 118 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 8 हजार 649 वर पोहोचली आहे.

covid 19 cases in india
भारतातील कोरोना रुग्ण स्थिती

महाराष्ट्रात 11 हजार 88 नवे कोरोनाबाधित

राज्यात मंगळवारी 10 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 68 हजार 435 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 68.79 टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात 11 हजार 88 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 553 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात मंगळवारी 256 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.42 टक्के एवढा आहे.

दिल्लीत मंगळवारी 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू

देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये मंगळवारी 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे दिवसभरात मृत्यू झालेल्यांची संख्या 10 च्या खाली येण्याची दोन महिन्यातील ही पहिलीच वेळ आहे. मंगळवारी 1 हजार 257 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी महत्वाची आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

तामिळनाडूला केंद्राकडून 512.64 कोटी रुपयांची मदत

केंद्र सरकारकडून तामिळनाडूला आपत्ती निवारण आणि आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी 712.64 कोटी रुपयांपैकी 512.64 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी मंगळवारी दिली. तामिळनाडू राज्यात महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

तेलंगाणामध्ये पोलीस उपअधीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

तेलंगाणा राज्यामध्ये मंगळवारी पोलीस उपअधीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यासह एकूण 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 645 वर पोहोचली आहे. 50 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याने 1996 मध्ये सेवा सुरु केली होती. सध्या ते महाबुबाद जिल्ह्यात सेवा बजावत होते. तेलंगाणा राज्यात दिवसभरात 1 हजार 896 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 82 हजार 647 वर पोहोचली.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. चौहान यांना 25 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुधवारपासून आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे चौहान यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 29 हजार 674 वर पोहोचली आहे. दिवसभरात 193 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.

महसुलातील तूट भरुन काढण्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्याकडून पॅकेजची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी कोरोनामुळे राज्याच्या महसूलात घट झाल्याचे सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्नात 50 टक्के घट झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे केंद्र सरकारने महसुलातील तूट भरुन काढण्यासाठी पॅकेज द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. राज्य आपत्ती मदत निधीतील खर्चावर घालण्यात आलेली 35 टक्के खर्चाची मर्यादा कोरोना संकटात वाढवण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

झारखंडमध्ये कोरोना मृत्यूंची संख्या 189 वर

झारखंड राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 189 झाली आहे. राज्यात 531 कोरोनाबाधित रुग्ण वाढल्यामुळे रुग्णसंख्या 18 हजार 786 वर पोहोचली आहे. झारखंडमध्ये सध्या 8 हजार 849 रुग्णांवर उपचार सुरु असून 9 हजार 748 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.