ETV Bharat / bharat

मोदींना कितीही बहुमत मिळाले तरी ते ३७० कलम हटवू शकत नाहीत - फारुक अब्दुल्ला - bjp

पंतप्रधानांनी देशातील जनतेत फूट पाडण्याऐवजी त्यांना जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांना मिळालेल्या बहुमाताचा त्यांनी देशाच्या एकतेसाठी वापर करणे योग्य राहील. आम्ही देशाचे सैनिक आहोत, शत्रू नाही. मोदींनी बहुमताचा वापर आमच्याविरुध्द करू नये, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

फारुक अब्दुल्ला
author img

By

Published : May 24, 2019, 10:15 PM IST

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी कितीही बहुमताने आले आणि त्यांचे सरकार कितीही शक्तीशाली असले तरी ते कलम ३७० आणि ३५-अ हटवू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया नॅशनल काँन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी दिली आहे. संसदेत भाजपला कितीही बहुमत असले तरी त्याने काहीच फरक पडत नाही. जम्मू काश्मीरसाठीचे ३७० कलम हटवने त्यांना शक्य नसल्याचे ते म्हणाले.

१७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह रालोआला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तसेच आता राज्यसभेतही भाजपच्या जागा वाढून काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी मोदी सरकारच्या अडचणी दूर होणार आहेत. त्यापैकी जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५-अ मधील तरदुदी रद्द करण्याबाबतच्या निर्णयाचाही समावेश आहे. त्यामुळे मोदी ३७० कलमात हस्तक्षेप करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यावर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काश्मीरी नेते फारुक अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी देशातील जनतेत फूट पाडण्याऐवजी त्यांना जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांना मिळालेल्या बहुमाताचा त्यांनी देशाच्या एकतेसाठी वापर करणे योग्य राहील. आम्ही देशाचे सैनिक आहोत, शत्रू नाही. मोदींनी बहुमताचा वापर आमच्याविरुध्द करू नये. कलम ३७० आणि ३५ अ पुर्णत: संरक्षित आहेत. कोणतेही सरकार बहुमतात आले तरी या कलमाला हात लावू शकत नाही. जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी राज्यघटनेत ३७० कलम समाविष्ट केले आहेत. देशाच्या राज्यघटनेने काश्मीरी जनतेला दिलेला तो एक मौलीक अधिकार आहे. त्यात कोणालाही बदल करता येणार नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Intro:Body:

CM Rupani Byte On Surat Incident

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.