ETV Bharat / bharat

'जेकेसीए' घोटाळ्याप्रकरणी फारुख अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी

जेकेसीएमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. २०१५ साली जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने क्रिकेट असोशिएशन घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

फारुख अब्दुल्ला
author img

By

Published : Jul 31, 2019, 3:14 PM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची आज (बुधवारी) सक्तवसुली संचलनालयाने चौकशी केली. जम्मू काश्मीर क्रिकेट असोशिएशनमधील (जेकेसीए) घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. चंदीगड कार्यालयात दुपारी त्यांची चौकशी करण्यात आली.

  • Former CM of J&K and National Conference leader Farooq Abdullah's questioning underway by Enforcement Directorate in Chandigarh in connection with Jammu & Kashmir Cricket Association (JKCA) irregularity scam case. pic.twitter.com/U6Zxgn6MRf

    — ANI (@ANI) July 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जेकेसीएमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. २०१५ साली जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने क्रिकेट असोशिएशन घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. या घोटाळ्याची रक्कम ११३ कोटी असल्याचे बोलले जात आहे. राज्य पोलीस दल या घोटाळ्याचा तपास नीट करत नसल्याचे म्हणत न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते.

विवादित प्रस्तावांना मंजुरी दिल्याचा आरोप फारुख अब्दुल्लांवर आहे. या प्रकरणातील आरोपी अहसान मिर्जा यांच्याकडे वित्तीय अधिकार असताना बनावट खात्याद्वारे मंडळाचे व्यवहार झाले. या प्रकरणी पैशांची देवाणघेवाण बीसीसीआय सोबतही झाल्यामुळे हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी आणखी लोकांचीही चौकशी झाली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.