ETV Bharat / bharat

LIVE : दिल्ली चलो आंदोलनाचा १८वा दिवस; आंदोलन तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा - शेतकरी आंदोलन दिल्ली

Farmers protest against Farm acts enters in 18th day See LIVE updates
LIVE : दिल्ली चलो आंदोलनाचा १८वा दिवस; आंदोलन तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
author img

By

Published : Dec 13, 2020, 10:42 AM IST

Updated : Dec 13, 2020, 3:45 PM IST

15:45 December 13

राजस्थान : दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करण्याचे नियोजन शेतकरी आंदोलकांनी केले आहे. त्यामुळे हरयाणा, दिल्ली आणि राजस्थानातील पोलीस सतर्क झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जयसिंगपूर- खेरा सीमेवर पोलिसांनी बॅरिकेड टाकून परिसर बंद केला आहे.     

12:04 December 13

छिल्ला सीमेवरील वाहतूक सुरू..

शेतकऱ्यांनी छिल्ला सीमेवरील वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी शेतकरी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.

12:01 December 13

राजस्थानमध्ये जयसिंगपूर-खेरा सीमेवर शेतकऱ्यांचा ठिय्या..

राजस्थान आणि हरियाणाची सीमा असलेल्या जयसिंगपूर-खेरावर शेकडोंच्या संख्येने शेतकरी ठिय्या मांडून आहेत. याठिकाणी ते गेल्या १२ दिवसांपासून बसून आहेत. याठिकाणी आणखी शेतकरी संघटना येणार आहेत, त्या आल्या की मोठ्या संख्येने आम्ही दिल्लीला जाणार आहोत, असे एका आंदोलकाने सांगितले.

10:38 December 13

शेतकरी आंदोलक देशद्रोही; सर्वांना अटक करायला हवी - प्रज्ञा सिंह ठाकूर

आंदोलन करणारे शेतकरी हे शेतकरी नसून काँग्रेस आणि डाव्या संघटनांतील लोक आहेत. हे सर्व देशद्रोही असून या सर्वांना अटक करण्यात यावी, असे भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या. केंद्राचे कृषी कायदे हे अगदी योग्य असून, शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

10:38 December 13

नवीन कृषी कायद्यांचा मराठी अनुवाद शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद - केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र, भाजपकडून हा कायदा कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, हे समजावून सागण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारने आणलेले नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना समजावेत यासाठी त्या विधेयकाचा मराठी अनुवाद लोकांपर्यत पोहोचवण्यात येणार आहे, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

10:37 December 13

...अन्यथा महाराष्ट्रातही भडका उडेल; दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीवेळी राजू शेट्टींचा इशारा

दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलन हे फक्त पंजाब, उत्तरप्रदेश व उत्तराखंड राज्याचे नाहीये तर काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंतचे सर्व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा देश अशांत झाला तर कोणालाही कारभार करता येणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गाजीपूर बॉर्डर दिल्ली येथील किसान आंदोलनात दिला.

10:36 December 13

वॉशिंग्टनमधील गांधींच्या पुतळ्याची विटंबना; शेतकरी आंदोलनाआडून खलिस्तानी चळवळीचे कृत्य

वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय दूतावासासमोर असलेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पुतळ्यावर खलिस्तानचे झेंडे असल्यामुळे, शेतकरी आंदोलनाच्या आडून खलिस्तानी संघटनांनी हे कृत्य केल्याचे दिसून येत आहे.

10:26 December 13

राजस्थान, पंजाब आणि हरियाणामधील आणखी शेतकरी दिल्लीकडे रवाना..

आंदोलन सुरू झाल्यापासून दिल्लीमधील शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र अशा विविध राज्यांमधून शेकडो शेतकरी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. तसेच आणखी मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीमध्ये येतच असल्याचे सांगण्यात येत आहे. १६ डिसेंबरला दिल्लीमध्ये आणखी ५०० ट्रॉलीज पोहोचणार असल्याची माहिती येथील एका शेतकऱ्याने दिली.

09:49 December 13

LIVE : दिल्ली चलो आंदोलनाचा १८वा दिवस..

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या दिल्ली चलो आंदोलनाचा आज १८वा दिवस आहे. आतापर्यंत या आंदोलनातून कोणताही तोडगा समोर आला नसून, हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

आज जयपूर-दिल्ली, दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस वे बंद करण्याची घोषणा..

आपले आंदोलन तीव्र करत, शेतकऱ्यांनी आज दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस वे बंद करण्याची घोषणा केली आहे. यासाठी आज सकाळी अकराच्या सुमारास शेकडो शेतकरी या महामार्गांवर आंदोलन करणार आहेत.

Last Updated : Dec 13, 2020, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.