ETV Bharat / bharat

आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही; शेतकरी संघटनांचे मोदी आणि तोमर यांना पत्र - शेतकरी संघटना आंदोलन

शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी असा आरोप केला होता, की विरोधी पक्षातील नेते शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत गैरसमज पसरवत आहेत. त्यावर प्रत्युत्तर देत एआयकेएससीसीने ही पत्रं लिहिली आहेत. "शेतकऱ्यांना कोणताही पक्ष आंदोलन करण्यास सांगत नसून, शेतकरी स्वतःच केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. उलट, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच विरोधी पक्षांनी आपली मतं बदलली आहेत" असे या पत्रात म्हटले आहे.

Farmers' agitation not affiliated to any political party, farmers group writes to PM, Tomar
आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही; शेतकरी संघटनांचे मोदी आणि तोमर यांना पत्र
author img

By

Published : Dec 20, 2020, 7:05 AM IST

नवी दिल्ली : अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीने (एआयकेएससीसी) शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहिले. शेतकऱ्यांचे सध्या सुरू असलेले आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे. समितीने मोदी आणि तोमर यांना हिंदीमध्ये वेगवेगळी पत्रं लिहीत हे स्पष्ट केले.

शेतकरी आंदोलनामुळे विरोधी पक्ष झाले जागे..

शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी असा आरोप केला होता, की विरोधी पक्षातील नेते शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत गैरसमज पसरवत आहेत. त्यावर प्रत्युत्तर देत एआयकेएससीसीने ही पत्रं लिहिली आहेत. "शेतकऱ्यांना कोणताही पक्ष आंदोलन करण्यास सांगत नसून, शेतकरी स्वतःच केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. उलट, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच विरोधी पक्षांनी आपली मतं बदलली आहेत" असे या पत्रात म्हटले आहे.

२४ दिवसांपासून सुरुये आंदोलन..

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २४ दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने दिल्लीमध्ये येण्यास मज्जाव केल्यामुळे शेतकरी आंदोलक हे दिल्लीच्या सीमांवरच थांबून आहेत. आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमा बंद केल्या असून, जोपर्यंत सरकार कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आपण इथेच आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

कृषी कायद्यांचे कौतुक सुरूच..

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना संबोधित केले. यावेळीही त्यांनी कृषी कायद्यांची स्तुती करत ते शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार केला. शेतकरी विरोधी पक्षांच्या अपप्रचाराला बळी पडून या कायद्यांविरोधात बोलत आहेत असेही मोदी यावेळी म्हणाले.

हेही वाचा : माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांची ११.८६ कोटींची मालमत्ता जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.