चंदीगड - सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी आपल्या शैलीमध्ये कोरोना विषाणूबाबत जनजागृती केली आहे. संचारबंदी चालू आहे, सर्वांनी घरीच थांबा कोणीही बाहेर निघू नका, असे आवाहन निगम यांनी केले आहे. तसेच डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सोनू निगम यांनी सांगितले आहे, की माझा जन्म हरयाणामध्ये झाला, इथे माझं बालपण गेलं त्यामुळे माझा हरयाणा आणि भारतभूमीवर खूप प्रेम आहे. कोरोना नावाचं मोठं संकट आपल्यावर येऊन ठेपलं आहे. त्यातून आपण नक्कीच लवकर बाहेर पडू. फक्त सरकार जे सांगत आहे, ते लोकांनी ऐकायल हवं.