ETV Bharat / bharat

तामिळनाडूमध्ये समलिंगी महिला जोडप्याने केली आत्महत्या - समलिंगी जोडपे आत्महत्या न्यूज

तामिळनाडूमधील नामक्कल जिल्ह्यात एकमेकिंशी समलैंगिक संबंध असलेल्या दोन महिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघींपैकी एकीला जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले गेल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

same-sex couple commit suicide
same-sex couple commit suicide
author img

By

Published : May 18, 2020, 1:42 PM IST

हैदराबाद - तामिळनाडूमधील नामक्कल जिल्ह्यात एकमेकिंशी समलैंगिक संबंध असलेल्या दोन महिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या संबधांवर आक्षेप घेतल्याने समलिंगी जोडीने गळफास लावून आत्महत्या केली. दोघींपैकी एकीला जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले गेल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

same-sex couple commit suicide
same-sex couple commit suicide

कीर्ती (नाव बदलले आहे) आणि स्वेथा (नाव बदलले आहे) या दोघी पॉवरलूम कार्यशाळेमध्ये एकत्र काम करत होत्या, अशी माहिती आहे. कीर्तीचे (वय 23) आधीपासूनच एका पुरुषाशी लग्न झाले होते आणि तिला तीन वर्षाचे मूलही होते.

सोबत काम करताना दोघींमध्ये मैत्री वाढली आणि हळूहळू संबंध बनले. मात्र, त्यांच्या नातेसंबंधाची माहिती कळताच त्यांच्या कुटुंबियांनी या दोघींना एकमेंकापासून दूर राहण्याचा इशारा दिला.

नातेसंबंधाची माहिती मिळताच स्वेथाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न लावण्याचे ठरवले. साखरपुडा होण्याच्या एक दिवस अगोदर दोघींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांनी मृतदेह दरम्याननामाक्कल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.