नवी दिल्ली - भारतासह अमेरिका, युरोप आणि जगातील अनेक ठिकाणी फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाले आहे. रात्री सुमारे साडेनऊ वाजल्यापासून अनेकांना फेसबुक डाऊन झाल्याचा मेसेज फेसबुक उघडताना दिसत होता. पहाटे ४ वाजेपर्यंतही फेसबुक सुरळीत होऊ शकलेले नाही.
कित्येक जणांचे फेसबुक सुरू होत नसून अनेकांना लाईक आणि कमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवरही फोटो अपलोड करताना त्रास सहन करावा लागत आहे. फेसबुक डाऊन झाल्याने वापरकर्ते नाराज झाले आहेत. याबद्दलची नाराजी अनेकांनी ट्विटरवर व्यक्त केली. इतका वेळ फेसबुक डाऊन झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याची शक्यता आहे.
सध्या फेसबुक डाऊन आहे. काही मिनिटांमध्ये सेवा पूर्ववत होईल, असेनोटिफिकेशन फेसबुकवर लॉग इन करताच दिसू लागतो. या नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट अनेकांनी ट्विटरवर शेअर केला आहे. अनेकांनी यावरुन फेसबुकची खिल्लीदेखील उडवली आहे.