ETV Bharat / bharat

'सरकारी अधिकाऱ्यांनी टोमणे मारल्याचा कनिमोझी यांच्याप्रमाणेच अनुभव घेतला'

पी. चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले, की डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांना चेन्नईच्या विमानतळावरील आलेला वाईट अनुभव ही सामान्य बाब आहे. मलाही सरकारी अधिकारी व सामान्य नागरिकांनी टोमणा मारण्याचा अनुभव आला आहे.

author img

By

Published : Aug 10, 2020, 2:02 PM IST

संग्रहित - पी. चिदंबरम
संग्रहित - पी. चिदंबरम

नवी दिल्ली – तामिळनाडूमध्ये भाषेच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाषावादात तामिळनाडूमधील मूळचे रहिवासी असणारे काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांची बाजू घेतली आहे. हिंदी न बोलण्याने खासदार कनिमोझी यांना त्यांच्या नागरिकत्वाबाबत विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याने प्रश्न विचारला होता.

पी. चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले, की डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांना चेन्नईच्या विमानतळावरील आलेला वाईट अनुभव ही सामान्य बाब आहे. मलाही सरकारी अधिकारी व सामान्य नागरिकांनी टोमणा मारण्याचा अनुभव आला आहे. अनेकदा टेलिफोनवर तर कधी समोरासमोर असतानाही हिंदी बोलण्याचा आग्रह केला जातो.

माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम म्हणाले, की जर खरेच केंद्र सरकार हे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांना कार्यालयीन कामांसाठी वचनबद्ध असेल तर, त्यांनी सर्व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दोन्ही भाषांचा आग्रह करावा. हिंदी न बोलणारे नोकरी रुजू झाल्यानंतर हे कामापुरते हिंदी त्वरित शिकतात, तर हिंदी शिकणारे हे कामावर रुजू झाल्यानंतर कामापुरते इंग्रजी का शिकत नाहीत? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

भाजपने फेटाळले आरोप -

भाजपचे महासचिव बी. एल. संतोष यांनी कनिमोझी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कनिमोझी यांचे ट्विट हा निवडणुकीसाठी स्टंट आहे. विधानसभा निवडणुका या आठ महिन्यांवर आल्या आहेत. प्रचाराला सुरुवात झाल्याचा टोला भाजपच्या महासचिवांनी कनिमोझी यांना लगावला आहे.

दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने चेन्नई विमानतळावरील संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याची अंतर्गत चौकशी करणार असल्याचे जाहीर केले. कनिमोझी या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या कन्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.