नवी दिल्ली - एक्झिट पोलने दिलेले अंदाज चुकीचे असून २३ मे रोजी खरा निर्णय समोर येईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी केला आहे.
एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही. कारण मागच्या आठवड्यामध्ये ऑस्ट्रेलियातील ५६ वेगवेगळे एक्झिट पोल चुकीचे ठरले गेले आहेत. आपल्या देशात बरेच लोक भीतीमुळे सत्य सांगत नाही. त्यामुळे खऱ्या रिझल्टसाठी २३ मे पर्यंत वाट पाहा, असे ट्विट शशी थरुर यांनी केले आहे. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये ऑस्ट्रेलियात जसे एक्झिट पोल चुकीचे ठरले तसेच ते भारतातही ठरतील, असे ते म्हणाले.
रविवारी २० मे रोजी १७ व्या लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर विविध माध्यम आणि संस्थांनी एक्झिट पोल सादर केले. यामध्ये पुन्हा एकदा एनडीए प्रणीत भाजप सरकार येताना दिसत आहे.