ETV Bharat / bharat

'बंगालच्या जनतेला तृणमूल काँग्रेस आणि पोलिसांची लाज वाटतेय'

कैलाश विजयवर्गीय यांनी दगडफेकीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतासारख्या लोकशाही देशात अशा हल्ल्यांचा त्यांनी निषेध व्यक्त केला. अम्फान मदत निधीत घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला.

कैलाश विजयवर्गीय यांची प्रतिक्रिया
कैलाश विजयवर्गीय यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Dec 11, 2020, 5:31 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले असता काल (गुरुवार) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या हल्ल्यामुळे बंगालच्या जनतेला टीएमसी आणि पोलिसांची लाज वाटत आहे, अशी प्रतिक्रिया कैलाश विजयवर्गीय यांनी आज दिली.

लोकशाही देशात अशा हल्ल्यांचा निषेध

कैलाश विजयवर्गीय यांची प्रतिक्रिया

कैलाश विजयवर्गीय यांनी दगडफेकीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतासारख्या लोकशाही देशात अशा हल्ल्यांचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. जे. पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना भेटण्यास जात असताना ताफ्यातील गाड्यांवर हल्ला झाला. जे. पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. २०२१ मधील निवडणुकीच्या तयारीसाठी जे. पी नड्डा राज्यात आले होते.

तृणमूलने हल्ला केल्याचा आरोप

डायमंड हार्बर येथे जात असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमचा रस्ता अडवला आणि नड्डा यांच्या गाडीवर आणि ताफ्यातील इतर गाड्यांवर दगडफेक केली. यातून टीएमसीची मानसिकता दिसून येते, असे बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष म्हणाले. दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत गाड्यांना सुखरूप जाण्यास रस्ता करून दिली.

भाजपा नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय हा दगडफेकीत जखमी झाले आहेत. लोकशाही देशासाठी ही लज्जास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया जे. पी नड्डा यांनी हल्ल्यानंतर दिली आहे. माध्यम प्रतिनिधींच्या गाड्यांवरही हल्ला झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

अम्फान वादळासाठी दिलेल्या निधीत घोटाळा -

अम्फान वादळानंतर केंद्राने बंगाल सरकारला मदतनिधी म्हणून २ हजार २०० कोटी रुपये दिले होते. या पैशांचा अपहार झाल्याचा आरोप विजयवर्गीय यांनी ममता सरकारवर केला. हा पैसा पीडितांपर्यंत पोहचला नाही तर टीएमसीच्या कार्यकर्त्यांच्या शिखात गेला. उच्च न्यायालयानेही या संबंधी अहवाल मागितल्याचे विजयवर्गीय म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.