नवी दिल्ली - बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे जनता दल पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमांतून झळकत आहेत. दरम्यान, पांडे यांनी आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भेट घेतली. जनता दल युनायटेड पक्षात ते प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच त्यांनी पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्तीही घेतली आहे.
बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्तीची विनंती २४ तासांच्या आत मान्य केली आहे. निवृत्तीसाठी पाच महिने शिल्लक असताना त्यांनी पोलीस सेवेला रामराम ठोकला. सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्याते पांडे जनता दल पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना माध्यम प्रतिनिधिंनी गराडा घातला होता.
-
I came here to meet CM Nitish Kumar & to thank him as he gave me absolute freedom to serve my duties as DGP. I have yet not taken any decision on contesting polls: Gupteshwar Pandey, former Bihar DGP on being asked about him joining a political party, ahead of #BiharElections2020 pic.twitter.com/EkqiqDM9HT
— ANI (@ANI) September 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I came here to meet CM Nitish Kumar & to thank him as he gave me absolute freedom to serve my duties as DGP. I have yet not taken any decision on contesting polls: Gupteshwar Pandey, former Bihar DGP on being asked about him joining a political party, ahead of #BiharElections2020 pic.twitter.com/EkqiqDM9HT
— ANI (@ANI) September 26, 2020I came here to meet CM Nitish Kumar & to thank him as he gave me absolute freedom to serve my duties as DGP. I have yet not taken any decision on contesting polls: Gupteshwar Pandey, former Bihar DGP on being asked about him joining a political party, ahead of #BiharElections2020 pic.twitter.com/EkqiqDM9HT
— ANI (@ANI) September 26, 2020
यावेळी ते म्हणाले, मी नितीश कुमार यांना भेटायला आणि पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी मला जे स्वातंत्र्य दिले त्याबद्दल आभार मानायला आलो आहे. निवडणूक लढण्याबाबात मी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, असे त्यांनी राजकीय पक्षात जाण्यासंबंधी विचारले असता सांगितले.