ETV Bharat / bharat

'कुठेही लपा.. घुसून मारू', दहशतवाद्यांना हा संदेश देण्यासाठीच बालाकोट एअर स्ट्राईक' - बालाकोट एअर स्ट्राईक

बालाकोट येथील पाकिस्तानी दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी २०१९ ला रात्री हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यामध्ये २०० पाकिस्तानी दहशतवादी आणि अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्थ झाल्याचा दावा भारताने केला होता.

बी. एस धानोआ
बी. एस धानोआ
author img

By

Published : Feb 26, 2020, 9:55 AM IST

नवी दिल्ली - माजी हवाई दल प्रमुख बी. एस. धानोवा यांनी बालाकोट एअर स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही कोठेही असा, घुसून मारू, असा संदेश पाकिस्तानी दहशतवाद्यांना द्यायचा होता. त्यामुळेच पाकिस्तानात घूसन एअर स्ट्राईक केली, अन्यथा आम्ही भारताच्या भूमीवरूनही हल्ला करू शकलो असतो, असे धानोवा म्हणाले.

  • Former Air Force Chief Birender Singh Dhanoa on one year of #BalakotAirstrike: The message that we wanted to give was, ‘ghus kar maarenge’ no matter where you are. Otherwise, we could have attacked them from our territory as well. pic.twitter.com/zGL32LnHCK

    — ANI (@ANI) February 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बालाकोट येथील पाकिस्तानी दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी २०१९ ला रात्री हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यामध्ये २०० पाकिस्तानी दहशतवादी आणि अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्थ झाल्याचा दावा भारताने केला होता. मात्र, पाकिस्तानने हा दावा फेटाळला होता. या घटनेनंतर दोन्ही देशामध्ये तणाव वाढून हवाई चकमकही झाली होती. तसेच दोन्ही देश युद्धजन्य परिस्थितीला सामोरे गेले होते.

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. अनेक निवडणुका झाल्या मात्र, भारतावर हल्ला झाला नाही. जर दहशतवादी हल्ला केला तर भारतीय लष्कर पुन्हा आपल्यावर कारवाई करेल या भीतीने दहशतवाद्यांनी हल्ला केला नाही, असे धानोवा म्हणाले.

पाकिस्तानमध्ये घुसून भारत दहशतवादी तळांवर हल्ला करेल, असे त्यांना वाटत नव्हते. मात्र, भारताच्या कारवाईमुळे वैचारिक आणि काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाल्याचे दिसत आहे. बालाकोट हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे, मागे वळून पाहिल्यावर समाधानी वाटते. यातून आपल्याला खूप शिकायला मिळाले. तसेच बालाकोट नंतर अनेक नव्या योजना अमलात आणण्यात आल्या आहेत, असे धानोवा म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.