ETV Bharat / bharat

Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...

author img

By

Published : Jun 18, 2020, 9:00 AM IST

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

etv-bharat-top-10-news-at-9-am
Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...

मुंबई - भारतात सलग बाराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज (गुरुवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५३ पैशांची तर डिझेलच्या दरात ६४ पैशांची वाढ करण्यात आली... भारताची आठव्या वेळेस संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली... कोरोनातून बरा झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचा अहमदनगरच्या राहुरीमधे झालेल्या चारचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला, यासह टॉप-१० बातम्या...

  • नवी दिल्ली - भारताची आठव्या वेळेस संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली. सर्वसाधारण सभेच्या एकूण 193 सदस्यांपैकी 184 सदस्यांनी बुधवारी झालेल्या निवडणुकीमध्ये भारताच्या बाजूने मतदान केले. भारतासोबतच आयर्लंड, मेक्सिको, आणि नॉर्वेने सुद्धा ही निवडणूक जिंकली तर कॅनडाला पराजय स्वीकारावा लागला. यामुळे भारत आता 2021 ते 2022 या कालावधीसाठी सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार आहे. भारताला मिळालेले अस्थायी सदस्यत्त्व हे खूप महत्त्वाचं असल्याचे मानले जाते. ज्यामुळे भारत शक्तीशाली देशांकडे वाटचाल करत आहे.

सविस्तर वाचा - संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड

  • अहमदनगर - कोरोनातून बरा झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचा अहमदनगरच्या राहुरीमधे झालेल्या चारचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. माधव संपत शिरसाठ (वय 28 वर्षे) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

सविस्तर वाचा - कोरोनातून वाचला.. पण 'या' कोरोना योद्ध्याने अपघातात गमावला जीव

  • नवी दिल्ली - भारतात सलग बाराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज (गुरुवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५३ पैशांची तर डिझेलच्या दरात ६४ पैशांची वाढ करण्यात आली. दिल्लीमध्ये आजचे पेट्रोलचे दर ७७.८१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७६.४३ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. मात्र, स्थानिक बाजारपेठेमध्ये याच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे.

सविस्तर वाचा - महागाईचा भडका..! पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

  • मुंबई - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दररोज पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा हा दरवाढीचा सपाटा मंगळवारी देखील कायम राहिला. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत.

सविस्तर वाचा - का उडतोय पेट्रोल-डिझेलचा भडका? जाणून घ्या कारणे

  • मुंबई - कोरोनामुळे देशभर २५ मार्च नंतरच्या देशांतर्गत वा विदेशी पर्यटन सहलींसाठी ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते, त्या प्रवाशांना परतावा नाकारणाऱ्या पर्यटन कंपन्यांविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने आक्रमक पाऊल उचलले आहे. त्यानुसार पर्यटन सहलींवरील परताव्याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीकडून ऑनलाईन सर्वेक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण बुधवार, २४ जून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन उपलब्ध असेल. तरी सर्व संबंधित ग्राहकांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे.

सविस्तर वाचा - पर्यटन कंपन्यांविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीचे आक्रमक पाऊल; परताव्याबाबत ऑनलाईन सर्वेक्षण

  • मुंबई - शालेय शिक्षण विभागाने राज्यभरात ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षणाचा मोठा गाजावाजा करत दोन दिवसांपूर्वी त्यासाठीची सुरूवातकेली आहे. अशात आता राज्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेनुसार ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल शिक्षणाचा मोठा बोजवारा उडू शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात केवळ 61 टक्के विद्यार्थ्यांना व्हाट्सअॅपद्वारे संपर्क होऊ शकतो. तर, उर्वरित 39 टक्के विद्यार्थी हे व्हॉट्सअॅपच्या संपर्काबाहेर आहेत. राज्यात ज्यांच्याकडे मोबाईलच नाही अशांची संख्या ही तब्बल 31. 76 टक्के इतकी आहे.

सविस्तर वाचा - धक्कादायक: राज्यात 35 टक्के विद्यार्थ्यांकडे टीव्ही, तर 31 टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नाहीत

  • औरंगाबाद - एखाद्याला कोरोना झाला, तर त्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्या रुग्णाला तातडीने दवाखान्यात पाठवलं जाते आणि त्याच्या कुटुंबीयांना एका प्रकारे वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिल्याचे पाहायला मिळते. मात्र, औरंगाबादच्या सिडको परिसरात एका फ्लॅटमध्ये कोरोनाबाधित मुलीवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी सोसायटीतील नागरिक त्या कुटुंबाला मदत करत आहेत.

सविस्तर वाचा -'हमे बिमारी से लढना है, बिमार से नही', नागरिकांनी भीती ना बाळगता कॉलनीत कोरोनाबाधिताची केली व्यवस्था

  • नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंगळवारी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज बुधवारी पुन्हा चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा - दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण

  • अमरावती - आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात पुरातन भगवान नागेश्वरा(शिव) मंदिर गावकऱ्यांनी खोदून काढले आहे. जिल्ह्यातील चेजराला मंडळातील पेरुमल्लापाडू गावामध्ये हे प्राचिन मंदिर सापडले आहे. हे मंदिर 300 वर्ष जुने असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला असून मंदिर पाहण्यास मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.

सविस्तर वाचा - आंध्रप्रदेश: नेल्लोर जिल्ह्यात गावकऱ्यांनी खोदून काढले पुरातन शिव मंदिर

  • चंदीगढ - पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली परिसरात सीमावादावरून चीनी सैन्यांशी झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. यातील चार जवान पंजाब राज्यातील होते. या जवानांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीसोबत आर्थिक मदत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जाहीर केली आहे. तसेच शहिदांच्या कुटुंबियांना दिलासा देत दु:ख व्यक्त केले आहे.

सविस्तर वाचा - गलवानमधील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना पंजाब सरकारची आर्थिक मदत, सरकारी नोकरीही मिळणार

देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.