मुंबई - राज्यात आज (सोमवार) १,९६२ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या ६७ हजार ७०६ झाली आहे... मुंबईत आज (सोमवार) कोरोनाचे 1,128 नवीन रुग्ण आढळून आले असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे... धुळे शहराजवळील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एस.एस.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या 6 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे... सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनावर मात केली आहे, यासह ईटीव्ही भारतच्या इतर टॉप-१० बातम्या...
- मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना आज ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले आहे. सध्या राज्यात ६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज राज्यातील १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या ६७ हजार ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा - CORONA : राज्यात ३,७२१ नवे कोरोना पॉझिटिव्ह..६ लाख नागरिक होम क्वारंटाईन
- मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा राज्यतही प्रसार होते आहे. त्यातही मुंबई शहर हे जणू कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याचे दिसत आहे. मुंबईत आज (सोमवार) कोरोनाचे 1,128 नवीन रुग्ण आढळून आले असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 67,635 वर पोहचला आहे, तर मृतांचा आकडा 3735 वर पोहचला आहे. मुंबईत आतापार्यंत 34,119 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या मुंबईत 29781 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सविस्तर वाचा - मुंबईत कोरोनाचे 1,128 नवे रुग्ण तर 66 जणांचा मृत्यू
- धुळे - शहराजवळील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एस.एस.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या 6 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज (सोमवार) सायंकाळी घडली. मृत्यू झालेल्या 3 विद्यार्थ्यांपैकी 2 जण हे धुळे शहरातील रहिवासी आहोत. तर 1 जण अमळनेर येथील रहिवासी आहे. इतर 3 जणांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - धुळे : पोहण्यासाठी गेलेल्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लळिंग धबधब्यात बुडून मृत्यू
- हैदराबाद - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्याकरिता राजू शेट्टींचे नाव निश्चित झाले आहे. मात्र शेट्टींचे नाव राष्ट्रवादी कॉग्रेसने सूचवल्याने त्यांच्या आमदारकीबाबत चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेची आमदारकी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टींनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली आहे
सविस्तर वाचा - विशेष मुलाखत : 'म्हणून' विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारली - राजू शेट्टी
- हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी हुतात्मा कर्नल बी. संतोष बाबू यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच, मदत म्हणून पाच कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. कर्नल संतोष बाबू यांना भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान वीरमरण आले होते. या झटापटीत कर्नल बाबूंसोबत देशाचे २० जवान हुतात्मा झाले होते.
सविस्तर वाचा - हुतात्मा कर्नल संतोष बाबूंच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा धनादेश...
- बीड - ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे आणि खतं मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. वेळेत खत मिळत नसल्याच्या तक्रारी ठिकठिकाणी समोर येत आहेत. यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी थेट ग्राऊंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी दुकानांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यासाठी त्यांनी सर्वसामान्य शेतकऱयांप्रमाणे शेतमाल विक्री करणाऱ्या दुकानात प्रवेश करून परिस्थिती जाणून घेतली.
सविस्तर वाचा - EXCLUSIVE: कृषी मंत्र्यांचे 'स्टींग ऑपरेशन', औरंगाबादेतील छाप्याचा अनुभव ऐका मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून...
- चंद्रपूर - नवविवाहित पत्नीच्या अचानक जाण्याचे पती दुःख सहन करू शकला नाही. त्यामुळे त्याने पत्नीच्या चितेला अग्नी देताना स्वतःही चितेच उडी घेतली. यात तो गंभीररित्या भाजला, गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले. मात्र, त्याला दुःखावेग अनावर झाल्याने, तेथून गेल्यावर त्याने विहिरीत जाऊन उडी घेत आपले जीवन संपवले. ही हृदयद्रावक आणि थरारपूर्ण घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम तळोधी या गावात घडली आहे. किशोर खाटीक असे आत्महत्या केलेल्या या पतीचे नाव आहे.
सविस्तर वाचा - ...अन् त्याने नवविवाहित पत्नीच्या चितेवरच घेतली उडी; गोंडपिपरी तालुक्यातील घटना
- देहराडून : उत्तराखंडच्या पिठोरगडमध्ये, भारत-चीन सीमेजवळील एक पूल कोसळला आहे. आज (सोमवार) एक अवजड ट्रक जेव्हा त्या पुलाला ओलांडत होता, तेव्हा त्या ट्रकच्या वजनामुळे हा पूल कोसळल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये ट्रकच्या चालकासह आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे. लियाम जोहर खोऱ्यातील मुनस्यारी तालुक्यात असलेल्या धापा-मिलाम रस्त्यावर ही दुर्घटना घडली.
सविस्तर वाचा - VIDEO : उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेजवळचा पूल कोसळला; दोन जखमी..
- बीड - सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज (सोमवारी) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याना डिस्चार्ज देण्यात आला. धनंजय मुंडे यांनी कोणावर मात केल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
सविस्तर वाचा - धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
- नागपूर - महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक मिळाली आहे. नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे. फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झालेल्या त्या यंदाच्या तुकडीतील देशातील एकमेव महिला अधिकारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सविस्तर वाचा - मराठी पाऊल पडते पुढे! नागपूरच्या अंतरा मेहता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक