ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या - महाराष्ट्र कोरोना अपडेट 2020

वाचा राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या दहा घडामोडी एकाच क्लिकवर...

etv bharat top 10 news at 11 pm
रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Aug 21, 2020, 7:10 AM IST

Updated : Aug 21, 2020, 10:52 PM IST

भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा सह पाच जणांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे... राज्यात आज १४ हजार १६१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहेत... राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 5 पोलिसांचा मृत्यू तर 303 पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहेत... जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वादरम्यान शहरातील तीन मंदिरे भक्तांसाठी खुले करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे... सिल्वर ओक नंतर शरद पवारांच्या गोविंद बागेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे...

  • नवी दिल्ली - भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅरा अ‍ॅथलीट मारियाप्पन थांगावेलु आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्रा यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने निवड समितीच्या शिफारशीस मान्यता दिली असून देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच संयुक्तपणे पाच खेळाडूंची निवड झाली आहे.

सविस्तर वाचा - रोहितसह पाच जणांना खेलरत्न, तर वेगवान गोलंदाज इशांत शर्माला अर्जुन पुरस्कार

  • मुंबई- राज्यात आज (शुक्रवार) ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के इतके आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार १६१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून राज्यात सध्या १ लाख ५६४ हजार ५६२ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा - महाराष्ट्रात दिवसभरात १४ हजार १६१ नवे कोरोना रुग्ण, ३३९ रुग्णांचा मृत्यू

  • नवी दिल्ली : जेईई (मेन्स) आणि नीट (यूजी) या प्रवेश परीक्षांची तारीख पुढे न ढकलण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतला आहे. त्यानुसार, जेईई मेन्स ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर; तर नीट (यूजी) ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे.

सविस्तर वाचा - JEE-NEET परीक्षा पुढे ढकलणार नाही; 'एनटीए'ने जाहीर केल्या तारखा..

  • बारामती (पुणे)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थान असणाऱ्या गोविंद बागेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गोविंद बाग येथील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आज दुपारी चौघांचे कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. चार जणांमध्ये तीन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथेही कोरोनाने शिरकाव केला होता.

सविस्तर वाचा - सिल्वर ओक नंतर शरद पवारांच्या गोविंद बागेतही कोरोनाचा शिरकाव; 4 जणांना संसर्ग

  • मुंबई - राज्यात कोरोना व्हायरस संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान लॉकडाऊन, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. कर्तव्य बजावताना गेल्या 24 तासात 303 पोलीस कोरोनाबाधित झाले असून, 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 136 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 12 पोलीस अधिकारी तसेच 122 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा - धक्कादायक; राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 5 पोलिसांचा मृत्यू, तर 303 पोलीस कोरोनाग्रस्त

  • हैदराबाद- कोरोना महामारीत नोकरी गमाविलेल्या व येत्या काही महिन्यात नोकरी जाईल, अशा औद्योगिक कामगारांना दिलासा देण्यासाठी सरकारने दिलासा देणारी योजना जाहीर केली आहे. यामध्ये कामगारांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही योजना कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ईएसआयसी) अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजना नावाने राबविण्यात येत आहे.

सविस्तर वाचा - नोकरी गमाविली तर ‘असा’ मिळू शकतो बेरोजगारीचा भत्ता; जाणून, घ्या सविस्तर माहिती

  • नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' (NEET), आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा 'जेईई' (JEE) पुढे ढकलण्यासंबधी पत्र लिहले आहे. यासंदर्भात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी टि्वट करून माहिती दिली आहे.

सविस्तर वाचा - 'नीट' पुढे ढकला, अन्यथा आत्महत्यांमध्ये वाढ होईल; सुब्रमण्यम स्वामींचे पंतप्रधानांना पत्र

  • मुंबई - जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वादरम्यान शहरातील तीन मंदिरे भक्तांसाठी खुले करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. दादर, भायखळा आणि चेंबूरमधील जैन मंदिर 22-23 ऑगस्टला उघडण्याची सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच मंदिर उघडल्यानंतर सर्वोतोपरी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंदिर प्रंबधकांना सांगितले आहे.

सविस्तर वाचा - मुंबईमध्ये पर्युषण पर्वादरम्यान जैन मंदिर उघडण्यास परवानगी

  • मुंबई - मार्चपासून मुंबईत कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना हा वेगाने पसरणारा आजार असल्याने आणि नवीन आजार असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे कोणत्याही परिस्थितीत पोस्टमार्टम केले जात नाही. मात्र, त्याचवेळी संशयित रुग्णांचा स्वब घेण्याआधी मृत्यू झाला, तर त्याचा स्व‌ॅब घेतला जात नाही की, त्याचे पोस्ट मार्टम होत नाही. परंतू, त्याची नोंद कोरोना मृत्यूमध्ये होते. परिणामी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.

सविस्तर वाचा - कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्यास ना स्वॅब, ना पोस्टमार्टम; नोंद मात्र कोरोना मृत्यूच्या यादीत

  • पुणे - कोरोनाच्या काळात रुग्णाकडून भरमसाठ बील वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. जास्तीचे बील आकारणार्‍या रुग्णालयावर आयुक्त, जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. एखाद्या रुग्णालयाने 100 रुपये जास्त घेतले, तर त्यांच्याकडून 500 रुपये वसूल करून गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - पार्थ पवार हे माझे मित्र.. राजेश टोपेंंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

Last Updated : Aug 21, 2020, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.