ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या - SHARAD PAWAR LATEST NEWS

वाचा राज्यासह देश, विदेशातील महत्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर...

etv bharat top 10 news at 11 pm
रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Aug 12, 2020, 9:50 AM IST

Updated : Aug 12, 2020, 10:55 PM IST

महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाचे १२ हजार ७१२ नवीन रुग्ण आढळले आहेत... पार्थ पवार यांनी राम मंदिर आणि सुशांतसिंह प्रकरणात केलेल्या विधानाचे राष्ट्रवादीत पक्षांतर्गत तीव्र पडसाद उमटले आहेत... राज्यात कोरोना चाचणींसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून ते प्रति चाचणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहेत... 'भारतीय रेल्वे भवन सेवा केंद्र'च्या नावाखाली देशभरातील लाखो तरुणांना कोट्यवधींचा चुना लावला जात असल्याचा प्रकार ई टीव्ही भारतने समोर आणला आहे...

  • मुंबई - राज्यात बुधवारी पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा - दिलासादायक : राज्यात आतापर्यंतचे सर्वोच्च 13 हजार 408 रुग्ण कोरोनामुक्त

  • मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राम मंदिर आणि सुशांतसिंह प्रकरणात केलेल्या विधानाचे राष्ट्रवादीत पक्षांतर्गत तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यासाठी आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन पार्थ पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत पार्थ पवार यांच्या विषयावर सर्वाधिक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.

सविस्तर वाचा - सिल्व्हर ओक : पार्थ पवारांच्या भूमिकेवर शरद पवारांची नाराजी

  • मुंबई- राज्यात कोरोना चाचणींसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून ते प्रति चाचणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे, आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १ हजार ९००, २ हजार २०० आणि २ हजार ५०० रुपये, असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - राज्यातील कोरोना चाचणी दरात तिसऱ्यांदा सुधारणा; प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात

  • नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी(५०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज(बुधवार) निधन झाले. त्यागी यांची प्रकृती उत्तम होती. त्यांना कोणताही त्रास नव्हता. मात्र, आज हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाले. राजीव त्यागी माध्यमांमधील एक प्रमुख चेहरा होते. अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभाग घेत असत. नुकतेच एका टीव्ही चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता.

सविस्तर वाचा - काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  • मुंबई - मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हेच वाईट राजकारण आहे. पुराव्याशिवाय आरोप करणे म्हणजे मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, अशा शब्दात मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

सविस्तर वाचा - पुराव्याशिवाय आरोप करणे हे गलिच्छ राजकारण, मंत्री शिंदे यांचा विरोधकांवर पलटवार

  • नवी दिल्ली – देशात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या चिनी कंपन्यांवर मोठी कारवाई करण्याचे मोदी सरकारने संकेत दिले आहेत. प्राप्तिकर विभागाने चिनी कंपन्या आणि त्यांचे भारतीय सहकारी यांच्या मालमत्तेवर छापे मारले आहेत. चिनी कंपन्यांनी बोगस कंपन्या स्थापून मनी लाँड्रिंग आणि हवालामधून पैसे हस्तांतरित केल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे.

सविस्तर वाचा - चिनी कंपन्यांचा मनी लाँड्रिग प्रकरणात सहभाग; प्राप्तिकर विभागाने टाकले छापे

  • मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राम मंदिरासंदर्भात केलेल्या विधानाला कवडीचीही किंमत नाही. त्यांच्या विधानाचा आणि पक्षाचा तसा कोणताही संबंध नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा - पार्थ पवार इमॅच्युअर.. त्याच्या विधानाला कवडीचीही किंमत नाही : शरद पवार

  • जयपूर - राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यात रविवारी (९ ऑगस्ट) पाकिस्तानातून भारतात विस्थापित झालेल्या कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह आढळून आले होते. या प्रकरणी आता एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नातेवाईक आणि गुंडांकडून त्रास होत असल्याचे लक्ष्मी नामक पीडित महिला सांगत आहे. सुमारे दीड तासाचा हा व्हिडिओ असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

सविस्तर वाचा - पाक विस्थापित कुटुंबीय मृत्यू प्रकरण: नातेवाईकांनी अन् गुंडांनी दिला त्रास.. पीडित महिलेचा व्हिडिओ समोर

  • मुंबई - सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करा, जिल्ह्याबाहेरील वाहतुकीला परवानगी द्या, ठिक-ठिकाणी असलेले लॉकडाऊन हटवा या मागणीसह आज वंचित बहूजन आघाडीने राज्यव्यापी 'डफली बजाव आंदोलन' केले. या आंदोलनाला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक नागरिकांनी यात सहभाग घेतला.

सविस्तर वाचा - लॉकडाऊन उठवण्यासह सार्वजनिक सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी वंचितचे राज्यव्यापी 'डफली बजाव'..

  • मुंबई - कोरोना लॉकडाऊन काळात नोकऱ्या गेल्याने लाखो तरुण सध्या रोजगाराच्या शोधात आहेत. याचाच फायदा घेत 'भारतीय रेल्वे भवन सेवा केंद्र'च्या नावाखाली देशभरातील लाखो तरुणांना कोट्यवधींचा चुना लावला जात असल्याचा प्रकार ईटीव्ही भारतने समोर आणला आहे. कशा प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लूट केली जात आहे, याबाबत ईटीव्ही भारतचा हा एक्सक्लुजिव रिपोर्ट...

सविस्तर वाचा - ईटीव्ही भारत एक्सक्लुझिव्ह: भारतीय रेल्वेच्या नावाखाली होतेय तरुणांची लूट!

Last Updated : Aug 12, 2020, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.