राज्यात आज(शुक्रवार) कोरोनाच्या १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे... एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला केरळमध्ये अपघात झाला असून आतापर्यंत या अपघातात वैमानिकासह चौदा जणांचा मृत्यू झाला आहे... 2021 साली होणारी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे... पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोरोनाच्या लसींचे 10 कोटी डोस तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे...
- केरळ - एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला केरळमध्ये अपघात झाला आहे. विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला अपघात झाला असून अपघातावेळी विमानात 191 प्रवासी प्रवास करत होते. प्राप्त माहितीनुसार मुख्य पायलटसह चौदा जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप बचाव कार्य सुरू आहे.
सविस्तर वाचा - केरळ विमान दुर्घटना: एअर इंडियाच्या वैमानिकासह 14 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक
- मुंबई : राज्यात आज(शुक्रवार) नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आज देखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५ हजार ५८२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा - राज्यात नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त; आज 10 हजार 906 रुग्ण कोरोनामुक्त
- तिरुवनंतपुरम - आज रात्री केरळमधील कोझीकोड धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. कोझीकोडमधील करीपूर विमानतळावर हा अपघात झाला. यात एका पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील मुख्य पायलट हा मुंबईतील असून, कमांडर कॅप्टन दिपक साठे असे त्या पायलटचे नाव आहे.
सविस्तर वाचा - एअर इंडिया विमान दुर्घटना: वैमानिक दिपक साठेंचा मृत्यू
- मुंबई - ६ मार्चला टायगर श्रॉफचा ‘बागी ३’ रिलीज झाला आणि अपेक्षेप्रमाणे पहिल्या आठवड्यातच त्याने १०० कोटींना गवसणी घातली, मात्र तोपर्यंत बॉलिवूडमध्ये कुणालाही पुढे नक्की काय वाढून ठेवलं आहे याची कदाचित कल्पना नसावी. पुढच्या तीन आठवड्यात तो किती कोटींना गवसणी घालणार याची चर्चा सुरू असतानाच, २६ मार्चला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि हा लॉकडाऊन १५-१५ दिवस करत मारूतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच गेला. भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांना याचा फटका बसला त्यामुळे संपूर्ण जगच जणू लॉक झालं आहे अशी परिस्थिती निर्माण झाली.
सविस्तर वाचा - ईटीव्ही भारत स्पेशल : लॉकडाऊनमुळं बॉलिवूडचं जवळपास तीन हजार कोटींचं नुकसान!
- हैदराबाद - आयसीसी बोर्डाची आज (शुक्रवार) बैठक पार पडली असून यात टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, 2021 साली होणारी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. तर, 2022 साली होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा हा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.
सविस्तर वाचा - टी-20 वर्ल्ड कप : 2021 च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद भारताकडे
- पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमधील मनसेच्या नगरसेवकावर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे आज (शुक्रवार) नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर उभारणीच्या कामाची पाहणी करायला आले होते. तेव्हा, मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर फिजिकल डिस्टन्सिंगवरून चांगलेच भडकले. ४ मंत्री कोरोनाबाधित झाले आहेत, थोडं लांब थांबून बोल, असे म्हणत अजित पवार चिखले यांच्यावर भडकले.
सविस्तर वाचा - थोडं लांबून बोल, अजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले
- हैदराबाद – पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोरोनाच्या लसींचे 10 कोटी डोस तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. हे डोस भारत आणि मध्य उत्पन्न असलेल्या देशांसाटी 2021 पर्यंत तयार करण्यात येणार आहे. या लसीची किंमत जास्तीत जास्त 3 डॉलर (सुमारे 225 रुपये) असणार आहे.
सविस्तर वाचा - सिरम कोरोनावरील 10 कोटी लसींचे करणार उत्पादन; पाहा किंमत...
- मुंबई - कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई, महाराष्ट्राचा विचार केला तर बरे होण्याचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचवेळी आता काहीशी चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. चीनमधील एका अभ्यासानुसार कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये श्वसनाचा विकार बळावत असून फुफ्फुसावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तर त्यांना बरेच दिवस ऑक्सिजनवर रहावे लागत आहे. मुंबईकरांसाठीही ही चिंतेची बाब आहे. कारण केईएम रुग्णालयात असे 22 रुग्ण आढळले आहेत. तर या आजाराला ‘पोस्ट इन्फेक्शन फायब्रोसिस’ असे संबोधले जात असल्याची माहिती आहे.
सविस्तर वाचा - अरे बापरे..! कोरोनामुक्त झाल्यानंतर ग्रासतोय श्वसनाचा विकार
- मुंबई - रॅपर बादशाहच्या गाण्याला लाखो-करोडो लोक फॉलो करतात. मात्र, यातील अनेक फॉलोअर्स फेक असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेला वाटते. याची चौकशी करण्यासाठी त्याला ७ ऑगस्ट रोजी बोलवण्यात आले होते. ६ तारखेला त्याला समन्स मिळाले होते. माहितीनुसार, गुन्हे शाखेने बादशाहसाठी २88 प्रश्नांची यादी तयार केली आहे.
सविस्तर वाचा - बनावट फॉलोअर्स रॅकेट प्रकरण: रॅपर बादशाहची क्राईम ब्राँच करतेय चौकशी
- हैदराबाद - आज भारतीय हरित क्रांतीचे जनक मनकोंबू संमबासिवन स्वामीनाथन यांचा 95 वा वाढदिवस आहे. 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूतील कुंभकोनम येथे स्वामीनाथन यांचा जन्म झाला. ते एक विख्यात अणुवंशशास्त्रज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ आहेत. भारतीय कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वामुळे भारत अन्यधान्यात स्वयंपूर्ण झाला.
सविस्तर वाचा - 'हरित क्रांती'च्या जनकाचा जन्मदिन: तीस लाख भुकबळी पाहिलेल्या स्वामीनाथन यांनी भारताला केले अन्नधान्य संपन्न