ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या - cbse result

राज्यासह देश-विदेशातील रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

etv bharat top 10 news at 11 pm
ईटीव्ही भारत रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Jul 13, 2020, 9:02 AM IST

Updated : Jul 13, 2020, 10:58 PM IST

हैदराबाद - राज्यात आज सोमवार) कोरोनाच्या ६ हजार ४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत... नाशिकमध्ये भरधाव जीपची दुचाकीला धडक बसल्याने मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले... राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सांगितले... सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे... भारतात डिजीटालयझेशन करण्याकरता गुगल भारतात सुमारे 75 हजार कोटींची (10 अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे... यासह वाचा राज्यातील आणि देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी...

  • मुंबई : कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस राज्यात वाढत असून राज्यात आज(सोमवार) ४ हजार १८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६ हजार ४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सविस्तर वाचा - राज्यात आज साडेसहा हजार नव्या रुग्णांची भर, १९३ जणांचा मृत्यू

  • सोलापुर - एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. अमोल अशोल जगताप (वय 36 वर्ष), मयुरी अमोल जगताप (वय 27 वर्ष), आदित्य अमोल जगताप (वय 5 वर्ष), आयुष अमोल जगताप (वय 3 वर्ष) राहणार हांडे फ्लॅट, जुना पुणे नाका येथील गुरुकृपा बिल्डिंगमध्ये या सर्वांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सविस्तर वाचा - धक्कादायक..! सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

  • मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 1 हजार 174 रुग्ण आढळून आले आहेत. तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

सविस्तर वाचा - मुंबईत कोरोनाचे 1,174 नवे रुग्ण; बरे होण्याचा दर 70 टक्के

  • मुंबई : अनेक गंभीर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरत आहे. मात्र, कोरोनातून बरे झालेले रुग्ण अजूनही म्हणावे तसे प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. अशावेळी यंदाचा गणेशोत्सव 'आरोग्य उत्सव' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेल्या लालबागचा राजा मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत मंडळाने 137 प्लाझ्मा दात्यांचा शोध घेत त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार केले आहे. आता 1 ऑगस्टपासून हे दाते परळ येथील केईएम रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहेत. तर, या दात्यांची संख्या आणखी वाढवण्यासाठी मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

सविस्तर वाचा - अरे वा! लालबागचा राजा मंडळाने शोधले 137 प्लाझ्मा दाते, लवकरच केईएमएमध्ये करणार प्लाझ्मा दान

  • नाशिक - शहरातील मातोरी रस्त्याने मखमलाबादकडे जाणाऱ्या शेतमजूरांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने आलेल्या पीकअप जीपने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, हे चारही जण धडक बसल्यानंतर दूरवर फेकले गेले होते. या धडकेत तीन वर्षाच्या मुलासह त्याचे आई-वडील आणि दुचाकीचालक असे चारजण जागीच ठार झाले आहेत. अपघातानंतर जीप चालक गाडी सोडून फरार झाला आहे.

सविस्तर वाचा - भरधाव जीपची दुचाकीला धडक, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील चार जण जागीच ठार

  • मुंबई - राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत परीक्षा रद्द करण्यासाठीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. करोनाचे संकट पाहता तूर्तास राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे. विद्यापीठ परीक्षांबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याने वाट पाहणार अशीही भूमिका सरकारने घेतली आहे.

सविस्तर वाचा - सरकारची भूमिका ठाम.. राज्यात तुर्तास परीक्षा नकोच!

  • ठाणे- कुख्यात गुंड विकास दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डण रामविलास त्रिवेदी आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी यांची रिमांड घेण्यासाठी युपी पोलीस ठाणे कोर्टात दाखल झाले होते. न्यायालयाने 16 जुलैपर्यंत ट्रान्झिट रिमांड दिला आहे. तर मुंबई एटीएसकडून त्रिवेदी आणि सोनू तिवारी यांना विमानने घेवून जायचे का, यावर न्यायालयाने संमती दर्शवली असून आरोपींना मंगळवारी मुंबई ते कानपूर विमानाने नेण्याचे ठरले आहे.

सविस्तर वाचा - ठरलं..! विकास दुबेचे ठाण्यातील साथीदार विमानानेच जाणार उत्तर प्रदेशला

  • पालघर - सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची आणि ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे मुख्य साधन असलेली लालपरी लॉकडाऊनमुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे. लॉकडाऊन काळात एसटी एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रस्त्यावर धावत असली, तरीही प्रतिबंधित क्षेत्राचा अडथळा तसेच कोरोनामुळे प्रवाशांची घटलेली संख्या यामुळे एसटीला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या तीन महिन्यात पालघर एसटी विभागाचा जवळपास 40 कोटी 50 लाख रुपये इतका महसूल बुडाला असून यामुळे एसटी विभागाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

सविस्तर वाचा - विशेष : लॉकडाऊन काळात एसटीचे आर्थिक गणित कोलमडले; 'लालपरी'ला कोट्यवधींचा तोटा

  • जालना - शहरातील नामांकित रुग्णालये रुग्णांकडून सक्तीने फी वसूल करत आहेत. तसेच रुग्णांवर उपचार करत असताना परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. त्यामुळे जालन्यात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असून त्याचे खापर शासनावर फुटत आहे. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, शहरात जी नामांकित रुग्णालये आहेत. त्या सर्व रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहे. या योजनेअंतर्गत 977 आजार येतात. त्यामुळे कोणत्याही रुग्णालयाने रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत पैसे मागू नये. अथवा ॲडव्हान्स देखील मागू नये. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर सदर रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.

सविस्तर वाचा - 'आरोग्य योजना' लागू असलेल्या रुग्णालयांनी पैसे आकारल्यास कारवाई : आरोग्यमंत्री

  • नवी दिल्ली – केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या डिजीटल इंडियाला गुगलकडून मोठा आधार मिळाला आहे. भारतात डिजीटालयझेशन करण्याकरता गुगल भारतात सुमारे 75 हजार कोटींची (10 अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुढील पाच वर्षांत विविध प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे

सविस्तर वाचा - डिजीटल इंडियाला मोठा डोस.. गुगल भारतात करणार तब्बल ७५ हजार कोटींची गुंतवणूक

Last Updated : Jul 13, 2020, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.