ETV Bharat / bharat

Top १० @११ PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

etv-bharat-top-10-news-at-11-pm
Top १० @११ PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
author img

By

Published : Jun 16, 2020, 1:03 PM IST

Updated : Jun 16, 2020, 10:57 PM IST

भारत-चीन सीमेवर सोमवारी मध्यरात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या वीस जवानांना वीरमरण आले. तसेच चीनच्या सैन्यामधील काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याच झटापटीत तामिळनाडूमधील पाळनी यांना वीरमरण आले.

सविस्तर वाचा - LIVE : भारत-चीन सीमेवर झटापट; तब्बल २० भारतीय जवानांना वीरमरण..

नवी दिल्ली : भारत-चीनच्या सीमेवरील गलवान येथे सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आल्याची माहिती समोर येत आहे. ही संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आपले १० जवान बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

सविस्तर वाचा - भारत-चीन सैनिकांमधील झटापटीला नवे वळण; तब्बल २० जवानांना वीरमरण..

नवी दिल्ली - गलवान परिसरातील भारत चीन सीमेवर सैनिकांच्या हाणामारीत चीनी सैनिकांचीही जिवितहाणी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती समोर आली आहे. गलवान व्हॅली परिसरात सैनिकांच्या हाणामारीत चीनी सैनिकांचीही जीवितहाणी झाल्याचे मला समजले आहे, असे ट्विट संपादक हु शिजीन यांनी ट्विट केले आहे.

सविस्तर वाचा - गलवान व्हॅलीतील सैनिकांच्या हाणामारीत चीनचीही जीवितहानी...चिनी वृत्तपत्राच्या संपादकाची कबुली

हैदराबाद - पूर्व लडाख भागातील गलवान परिसरात भारत चीनमधील सैनिकांच्या हाणामारीत तीन भारतीय जवानांना वीरमरण आले. चीनचेही सैनिक मारले गेल्याचे भारताने अधिकृतरित्या सांगितले आहे. मात्र, चीनने याबाबत माहिती उघड केली नाही. दरम्यान, चिनी लष्कराच्या जीवितहानाची माहिती देणाऱ्या चिनी पत्रकाराने युटर्न घेत आपले वक्तव्य बदलले आहे.

सविस्तर वाचा - पाच सैनिकांच्या मृत्यूसह 11 जण जखमी झाल्याच्या ट्विटवरून चीन पत्रकाराचा 'यूटर्न'

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान भागात भारत चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱयासह दोन जवानांना विरमरण आले. यावरून काँग्रेसने भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप हा सर्व प्रकार काहीही न करता शांतपणे पाहत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

सविस्तर वाचा - भारत- चीन सीमा वाद: पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गप्प का? काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली - इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. गरिबांच्या दु:खातून नफा कमवायचे थांबवा, असा खोचक टोला पंतप्रधानांना मारला आहे. कोरोना संकट काळात गरीब आणि मध्यम वर्गाच्या हातात थेट पैसे देण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली.

सविस्तर वाचा - गरिबांच्या दु:खातून नफा कमवायचं थांबवा; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

मुंबई - आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले, इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर सरकार आणि पालिकेने काहीही कारवाई न केल्याने फडणवीसांनी आज पुन्हा एकदा तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा - 'मुंबईला वाचवा.. शहरातील कोरोनाचे मृत्यू लपवण्यात आले, हा अक्षम्य गुन्हा'

नवी दिल्ली – राजधानीत सोने प्रति तोळा (10 ग्रॅम) 761 रुपयांनी महागले आहे. सोन्याचा दर हा 48 हजार 414 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंचे वाढलेले दर आणि रुपयाच्या घसरणीमुळे सोने महागल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

सविस्तर वाचा - सोने महागले! जाणून घ्या, भाववाढीचे नेमके कारण...

  • मुंबई - सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे, असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

सविस्तर वाचा - खाट का कुरकुरतेय?, मंत्री चव्हाण अन थोरातांवर सामनातून 'तिरकस बाण'

  • मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला बॉलिवूडचा घराणेशाहीवाद जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. दबंगचा दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यपने सुशांत सिंहच्या निधनाला बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री जबाबदार असल्याचे सांगत सुशांतच्या आत्महत्येच्या तळाशी जाऊन चौकशी व्हावी अशी मागणी पोलिसांच्याकडे केली आहे.

सविस्तर वाचा - सलमानच्या कुटुंबीयांनी माझं 'वाटोळं' केलं, 'दबंग' दिग्दर्शकाचा आरोप

Last Updated : Jun 16, 2020, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.