ETV Bharat / bharat

Top १० @ ११ AM : सकाळी अकरा पर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...

सकाळी अकरा पर्यंतच्या ठळक बातम्या

etv bharat top 10 at 11 am
Top १० @ ११ AM : सकाळी अकरा पर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...
author img

By

Published : Jun 13, 2020, 11:07 AM IST

मुंबई - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा आजपासून सुरू होणार आहे. शनिवारी (दि. 13 जून) दुपारी चार वाजता माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान होणार आहे. हा सोहळा 50 जणांच्या उपस्थित पार पडणार आहे....जम्मू आणि काश्मीर राज्यातील कुलगाम जिल्ह्याच्या निपोरा भागात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि लष्करांना यश आले आहे... कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मुंबईत शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे... यासह महत्वाच्या टॉप-१० घडामोडी...

  • राजगुरुनगर (पुणे) - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा आजपासून सुरू होणार आहे. शनिवारी (दि. 13 जून) दुपारी चार वाजता माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान होणार आहे. हा सोहळा 50 जणांच्या उपस्थित पार पडणार आहे. तसेच आज(शनिवारी) पहाटे चार वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर घंटानाद, काकड आरती, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती, पहाटपूजा करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा - आषाढी वारी..! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात

  • कुलगाम (जम्मू आणि काश्मिर) - दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि लष्करांना यश आले आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातील कुलगाम जिल्ह्याच्या निपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळीच चकमक सुरू झाली. या चकमकीत पोलिसांनी २ दहशवतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली. सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे.

सविस्तर वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

  • डेहराडून (उत्तराखंड) - आज (दि. 13 जून) झालेल्या भारतीय सैन्य अकादमीचा पासिंग आऊट परेड सोहळा संपन्न झाला. या परेडमध्ये 423 जवान सहभागी झाले होते. ज्यामध्ये 330 भारतीय कॅडेट्स आणि 90 विदेशी कॅडेट्सचा समावेश होता. यामध्ये सर्वाधिक 66 उमेदवार उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. तर महाराष्ट्रातील 18 जवान आज पास आऊट होऊन भारतीय लष्करात सहभागी झाले.

सविस्तर वाचा - भारतीय सैन्य अकादमीचा परेड सोहळा संपन्न, महाराष्ट्रातील 18 जणांचा समावेश

  • मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मुंबईत शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. तसेच, 90 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, कोरोनाचे 1 हजार 372 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 55 हजार 357 वर तर, मृतांचा आकडा 2 हजार 42 वर पोहोचला आहे. मुंबईत आतापार्यंत 25 हजार 152 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने सध्या 28 हजार 163 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

सविस्तर वाचा - मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक मृतांची नोंद, आकडा 2 हजार पार; 1372 नवे रुग्ण

  • रायगड - एकीकडे निसर्गाने बेघर केले तर दुसरीकडे वन विभागाचे अधिकारी तात्पुरती झोपडी बांधण्यासाठी परवानगी देत नाहीत. ही अवस्था अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी आदिवासी कुटुंबाची झाली आहे. चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली 25 कुटूंब आज वन विभागाच्या मोकळ्या जागेवर तात्पुरती झोपडी बांधून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वन विभागाचे अधिकारी त्यांना झोपडी बांधू देत नाहीत. सध्या 25 कुटुंबातील दीडशे जण एकाच छताखाली राहत असून ते उघड्यावर चुल मांडून जेवण बनवत आहेत. अशात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाय करून आमच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी कळकळीची मागणी आदिवासी बांधवानी केली आहे. वेलटवाडीच्या या आदिवासी कुटुंबाचा घेतलेला हा स्पेशल आढावा...

सविस्तर वाचा - 'निसर्गा'ने केलं बेघर आता वन विभागाचीही आठकाठी; २५ आदिवासी कुटुंब उघड्यावर...

  • हैदराबाद - तेलंगाणा सराकाने अडीच महिन्यांनंतर राज्यातील चित्रपट आणि टीव्ही शुटिंगचे नियम शिथिल केले आहेत. त्यानंतर रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रपटाच्या शुटिंगचे काम वेगाने सुरू झाले आहे.

सविस्तर वाचा - लॉकडाऊननंतर हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीत चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण सुरू

  • जून महिन्याच्या नऊ तारखेला स्वतःला कोविडमुक्त घोषित करत न्यूझीलंड जगातील नऊ कोरोनामुक्त झालेल्या देशांमध्ये सामील झाले आहे. देशात 29 मेपासून कोरोना विषाणूची कोणतीही नवी प्रकरणे आढळून आली नाहीत. हे यश आपण ‘नाचत’ साजरे केले, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडच्या तरुण पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी दिली.

सविस्तर वाचा - स्पष्ट संदेश आणि सुदृढ आरोग्य यंत्रणा हेच न्यूझीलंडच्या यशाचे गमक

  • हैदराबाद : आपण एका अशा देशात राहतो, जिथे जवळपास अर्ध्या नद्यांचे पाणी पिण्यायोग्य नाही. फक्त नद्याच नाहीतर असंख्य तलाव व जलसाठ्यांबरोबरच भूजल देखील प्रदूषित होत आहे. हैदराबाद महानगरात औद्योगिक व रासायनिक कचऱ्याच्या समस्येमुळे एकूण १८५ जलसाठे मृत होण्याच्या मार्गावर आहेत.

सविस्तर वाचा - देशातील जलस्रोत नामशेष होण्याच्या मार्गावर..

  • मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे गेले 2 ते 3 महिन्यांपासून खासगी प्रवासी बस सेवा बंद आहे. सरकारने खासगी बससेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा यावर अवलंबून असलेले हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती मुंबई बस मालक संघटनेचे सदस्य हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा - लॉकडाऊन इफेक्ट : खासगी बस व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ

  • मुंबई - घाटकोपर पूर्व येथील सावित्रीबाई फुले नगर येथे गुरुवारी दुपारी पाच वर्षांचा हमीद शेख नाल्यात पडला होता. शुक्रवारी शोधकार्यादरम्यान हमीद मृतावस्थेत आढळून आला. अग्निशमन दलाकडून गुरुवारी युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू होते. मात्र, संध्याकाळपर्यंत त्याचा शोध लागला नाही. अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती. शुक्रवारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. यावेळी हमीद स्थानिकांच्या हाती लागला. स्थानिकांनी राजावाडी रुग्णालयात नेला असता, त्यास मृत घोषित करण्यात आले.

सविस्तर वाचा - नाल्यामध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू, मुंबईतील घाटकोपरची घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.