हैदराबाद - महाराष्ट्रात आज (शनिवार) कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली... पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची आज (शनिवार) सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे... मुंबईच्या एच पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे आज कोरोनाने निधन झाले आहे... कर्नाटकातील रायचूर येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे... काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा आणि पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज(शनिवार) केला आहे... यासह राज्यातील आणि देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या...
- मुंबई - महाराष्ट्रात आज ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा - राज्यात कोरोनाच्या साडेबारा लाख चाचण्या; ९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू - आरोग्यमंत्री
- जळगाव - पोलीस एन्काऊंटरमध्ये एखाद्या गुन्हेगाराचा खात्मा होणे, यात काहीही वाईट नाही. कुविख्यात गुन्हेगाराचा खात्मा होणे ही गोष्ट स्वागतार्हच आहे. परंतु, गुंड विकास दुबे याच्या एन्काऊंटरबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. सर्वांच्या मनातील शंकांचे निरसन होण्यासाठी या प्रकरणाची लवकरात लवकर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असे मत राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
सविस्तर वाचा - "दूध का दूध.. यासाठीच विकास दुबे एन्काऊंटरची लवकरात लवकर न्यायालयीन चौकशी व्हावी"
- मुंबई – महामारी नियंत्रणात आणण्यासाठी धडपडणाऱ्या मुंबईच्या एच पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे आज कोरोनाने निधन झाले. मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर त्यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज संपली. कोरोनाच्या काळात त्यांनी अत्यंत उल्लेखनीय काम केल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यात त्यांचा एच पूर्व विभाग पहिल्या क्रमांकावर होता.
सविस्तर वाचा - मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन
- पुणे - महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची आज (शनिवार) सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. लॉकडाऊन संदर्भात वेगळी भूमिका घेतल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी आता विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार हे यापूर्वी पीएमआरडीचे सीईओ होते.
सविस्तर वाचा - पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाडांची तडकाफडकी बदली; विक्रम कुमार नवे आयुक्त
- रायचूर (कर्नाटक) - कर्नाटकातील रायचूर येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाने नाराज झालेल्या मुलीच्या परिवारातील लोकांनी मुलाच्या परिवारातील चार जणांची निघृण हत्या केली आहे. हत्या झालेल्या चौघांमध्ये दोन स्त्रिया आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
सविस्तर वाचा - धक्कादायक! प्रेमविवाह प्रकरणातून कर्नाटकात एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या
- नवी दिल्ली - कुख्यात गुंड विकास दुबे ठार झाल्यानंतर पोलीस आज (शनिवार) पुन्हा एकदा कानपूरमधील बिकारू गावात गेले आहेत. पोलिसांसोबत शीघ्र कृती दलाचे जवानही आहेत. पोलिसांवर केलेल्या चकमकीनंतर त्यांची शस्त्रे पळवून नेण्यात आली होती. ही शस्त्रे ताब्यात घेण्यासाठी पोलीस गावात गेले आहेत.
सविस्तर वाचा - विकास दुबे प्रकरण: पोलिसांची लुटलेली शस्त्रे परत करा, बिकारूवासियांना पोलिसांचा इशारा
- मुंबई - कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मुंबईत अँटीजनपद्धतीने कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. पालिकेकडे चाचणीचे 1 लाख किट आहेत. त्याचे वाटप करून येत्या 2 ते 3 दिवसांत मुंबईभर अँटीजन चाचणीला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
सविस्तर वाचा - कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा! संपूर्ण मुंबईत होणार अँटीजन चाचणी
- मुंबई - उत्तर प्रदेशातील कानपूर पोलीस हत्याकांडातील विकास दुबे याचा पोलिसांनी काल एन्काऊंटर केला. मात्र त्याचे काही साथीदार फरार होते. पोलिसांनी विविध ठिकाणी त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी पथकं रवाना केली होती. विकास दुबेचा साथीदार अरविंद त्रिवेदी ऊर्फ गुड्डण यास मुंबई एटीएसच्या जुहू पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याचासह वाहनचालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - विकास दुबे एन्काऊंटर : साथीदार अरविंद त्रिवेदीला जूहूत अटक
- जयपूर - काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा आणि पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज(शनिवार) केला. भाजपा निर्लज्जांचा पक्ष असून आमदारांना पक्ष बदलण्यासाठी कोट्यवधी रुपयाचे लालच देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला.
सविस्तर वाचा - राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न - मुख्यमंत्री गेहलोत
- नवी दिल्ली - मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात पंतप्रधान मोदींनी काल(शुक्रवार) 750 मेगा वॅटच्या सोलार प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे उद्घाटन केले. हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले होते. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
सविस्तर वाचा - रेवा सोलार आशियातील सर्वात मोठा प्रकल्प नाही; पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटला राहुल गांधींचं उत्तर