- मुंबई - शहर आणि परिसरात कोरोनाने थैमान माजवले होते. त्यामुळे इतर राज्यांमधून या शहरात आलेले मजूर काही दिवसांपूर्वी मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी जाताना दिसत होते, प्रसंगी पायपीट देखील पत्करत होते. पण आता हे चित्र बदलताना दिसत आहे. शहरातील व्यवसाय आणि कार्यालये टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. त्यामुळे इतर राज्यांमध्ये गेलेले नागरिक आता परत येताना दिसून येत आहे.
सविस्तर वाचा - अनलॉक 1.0 : हळूहळू मुंबईत स्थलांतरित मजुरांचे 'रिव्हर्स मायग्रेशन' सुरू
- यवतमाळ - जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असली की, अडचणींवर सहज मात करता येते. कोणत्याही योजनेचा लाभ नाही. त्यातही शेतजमीन खडकाळ आणि दगडी आहे. मात्र, यापैकी कोणत्याही कारणांचा पाढा न वाचता एका शेतकरी दाम्पत्याने दोन वर्षे घाम गाळून 30 फूट खोल विहीर खोदली. त्यांची मेहनत फळाला येऊन विहिरीला पाणीही लागले. आता अल्पभूधारक शेतकरी याच दगडी अन् खडकाळ जमिनीवर भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. ‘मांझी’ यांनी पत्नीच्या प्रेमापोटी पहाड खोदला तर, यवतमाळ जिल्ह्यातील लोणबेहळ येथील मांझीने संसार फुलविण्यासाठी विहीर खोदली.
सविस्तर वाचा - यवतमाळातील 'मांझी'ने २ वर्षं मेहनत करून खोदली ३० फूट खोल विहिर
सांगली - जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांसह सरकारी यंत्रणांचे वेतन कसे द्यायचे? हा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे. या वेतनासाठी कर्ज काढायची स्थिती निर्माण झाल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी सरकार सकारात्मक असून प्रसंगी प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
वाचा सविस्तर - अधिकाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची सरकारवर वेळ - जयंत पाटील
- मुंबई - मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यशोधन इमारतीत २८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या इमारतीत सनदी अधिकारी राहतात. अचानक इतक्या मोठ्या संख्येत कोरोनाबाधित सापडल्याने अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर वाचा - सनदी अधिकाऱ्यांच्या 'यशोधन' इमारतीत २८ जणांना कोरोनाची लागण
- मुंबई - एन 95 मास्कची वाढती मागणी लक्षात घेता हे मास्क अव्वाच्या सव्वा किंमतीत विकल्या जात आहेत. मात्र आता त्याला आळा बसणार आहे. कारण भारतातल्या चार मोठ्या कंपन्यांनी एन 95 मास्कच्या किंमती 47 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (एनपीपीए) च्या निर्देशानंतर या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे आता खासगी डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील ग्राहकांसह सर्वसामान्य ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे.
सविस्तर वाचा - अखेर एन 95 मास्कच्या किंमती 47 टक्क्यांनी कमी
- पुणे - ब्राम्हण महासंघाने आज सावरकर स्मारक या ठिकाणी चायना मोबाईल फोडून चीनचा निषेध केला. चीनने कोरोनाचा प्रसार जाणूनबुजून केला असल्याचा आरोप यावेळी महासंघाने केला. त्याचाच याठिकाणी निषेध करण्यात आला.
सविस्तर वाचा - ब्राह्मण महासंघाने रस्त्यातच फोडले चायना मेड मोबाईल, चिनी वस्तू न वापरण्याची घेतली शपथ
मुंबई - मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी आता घरकामासाठी घराघरात येणाऱ्या मोलकरणीसाठी नवीन नियम बनवण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मुंबईतील काही सोसायट्यांनी मोलकरणीची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. ती निगेटिव्ह असेल तरच तिला प्रवेश दिला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता मोलकरणीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून, घरकामगार संघटनानी मात्र याला जोरदार विरोध केला आहे. आम्ही चाचणी करु पण मग सोसायटीतील, घरातील प्रत्येकाची चाचणी करावी, अशी मागणी मोलकरणींनी केली आहे. तर ही जाचक अट असून, असे करत सोसायट्या उपनिबंधकाच्या आदेशाचा भंग करत असल्याचा आरोप सहकारी क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.
वाचा सविस्तर - कोरोना चाचणी असेल तरच मोलकरणींना घरात प्रवेश, मुंबईतील सोसायट्यांचे फर्मान
- मुंबई - 'मिशन बिगीन अगेन'च्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने देशातील मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार देशातील अनेक प्रार्थनास्थळे आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा - देशभरात प्रार्थनास्थळे आजपासून भाविकांसाठी खुली; मुंबईत देऊळबंदी कायम
वेलिंग्टन - न्यूझीलंड देश कोरोना व्हायरसमुक्त झाल्याबद्दल क्रिकेटपटू जिमी नीशमने देशवासियांचे अभिनंदन केले आहे. न्यूझीलंडमधील शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे देशात आता एकही न्यूझीलंडचा अॅक्टिव्ह रूग्ण नाही.
वाचा सविस्तर - कोरोनामुक्त न्यूझीलंड : जिमी नीशमने दिल्या देशवासियांना शुभेच्छा
मुंबई - अभिनेत्री कंगना रानौत आगामी 'अपराजित अयोध्या' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. राम मंदिर वादावर आधारित हा चित्रपट असेल.
वाचा सविस्तर - 'अपराजित अयोध्या'चे दिग्दर्शन करणार कंगना, राम मंदिर वादावर आधारित आहे चित्रपट