मुंबई - सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे... गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील भामरागड वनविभागाअंतर्गत येणाऱ्या गट्टा वनपरिक्षेत्र कार्यालयाची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली... मृतदेह जाळण्यासाठी वन विभागाच्या आगारात लाकडे नसल्याने मृतदेह वन विभागाच्या कार्यालयासमोर ठेवला... अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने लोकांना कोविड-19 च्या महामारीदरम्यान जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली- सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 40 पैसे तर डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर 45 पैसे वाढ झाली आहे.
सविस्तर वाचा - पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ; पेट्रोल 40, तर डिझेल 45 पैशांनी वाढले
- गडचिरोली – एटापल्ली तालुक्यातील भामरागड वनविभागाअंतर्गत येणाऱ्या गट्टा वनपरिक्षेत्र कार्यालयाची मंगळवारी (दि. 9 जून) रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. यामध्ये कार्यालय जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर वाचा - गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळले वनविभागाचे कार्यालय
- औरंगाबाद - शहरातील सातारा परिसरात बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. 9 जून) रात्री ही घटना उघडकीस आली. याबाबत सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा - धक्कादायक! औरंगाबादमध्ये बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या
- गोंदिया - मृतदेह जाळण्यासाठी वन विभागाच्या आगारात लाकडे नाहीत. शहरात पर्यायी सुविधा नाही. विद्युत शवदाहिनी नाही. मग मृतदेहाचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी मृतदेह चक्क वन विभागाच्या कार्यालयासमोर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (९ जून) दुपारच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे वन विभागातील कार्यालयात खळबळ उडाली.
सविस्तर वाचा - अंत्यविधीसाठी सरपण मिळेना, नातेवाईंकांनी मृतदहे ठेवला वन विभागाच्या कार्यालयासमोर
- श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुगो हेंढमा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
सविस्तर वाचा - J&K : शोपियान जिल्ह्यात लष्कर-दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांचा खात्मा
- चैन्नई - देशभरामध्ये कोरोनाविषाणूने थैमान घातले असून मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे आमदार जे.अंबाझगन यांचा मंगळवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे जन्मदिनीच त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 62 वर्षाचे होते.
सविस्तर वाचा - तामिळनाडूमध्ये डीएमके पक्षाच्या आमदाराचा जन्मदिनीच कोरोनामुळे मृत्यू
- काठमांडू - नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली यांनी मंगळवारी दक्षिण आशियाई शेजारी देश भारतासोबतचे तणावग्रस्त संबंध आणि सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या चर्चेसाठी नेपाळ भारताच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचे म्हटले.
सविस्तर वाचा - भारत-नेपाळ सीमावाद : लिपू लेख हिमालयीन खिंडीतून चीनला जाणाऱ्या 'लिंक रोड'मुळे तणाव
- इंम्फाळ (मणिपूर) - राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूर राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांवर निवडणूक होणार आहे. काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार या 1 जागेसाठी आमने सामने उभे आहेत. इतर पक्षांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. ही निवडणूक 26 मार्चलाच नियोजित होती. मात्र, कोरोना संकटामुळे निवडणूक आयोगाने आता जूनमध्ये निवडणूक घेण्याचे ठरवले आहे.
सविस्तर वाचा - मणिपूरमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजप-काँग्रेस आमने सामने
- मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने मंगळवारी इन्स्टाग्रामवरून लोकांना कोविड-19 या महामारीदरम्यान जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. देशभरात कोरोनामुळे पसरलेल्या साथीचे प्रमाण वाढत असतानाही लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. यानंतर लोकांची जबाबदारी वाढली असल्याचे परिणीतीने म्हटले आहे.
सविस्तर वाचा - कोरोनाची साथ वाढत असल्याने सर्वांची जबाबदारी वाढलीय - परिणीती चोप्रा
- मुंबई - लॉकडाऊनच्या काळात सलून व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणींबाबत शासनाला वेळोवेळी जाणीव करून देवून देखील शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. याच्या निषेधार्थ आज सलून दुकानांबाहेर काळ्या फिती बांधून शासनाचा राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सलून व ब्युटी पार्लर असोसिएशन निषेध करणार आहे.
सविस्तर वाचा - सलून कामगारांसह व्यावसायिकांचे राज्यभर आंदोलन