ETV Bharat / bharat

संविधान दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, प्रकाश आंबेडकर यांची विशेष मुलाखत.. - संविधान दिवस

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू. भारतीय संविधान दिनानिमित्त, 'ईटीव्ही भारत'शी बोलताना प्रकाश यांनी म्हटले, की बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणामुळेच असे संविधान लिहिले गेले, जे आज ७० वर्षांनंतरही लागू होत आहे. आजच्या पिढीशी आणि मागील पिढीशीही ते समरूप होते आहे. आजच्या पिढीच्या समस्यांना न्याय, आणि त्यांना आपले मत मांडण्याचा हक्क देते आहे.

ETV Bharat Special Interview of Prakash Ambedkar on the occassion of Constitution Day
प्रकाश आंबेडकर (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)
author img

By

Published : Nov 26, 2019, 11:19 AM IST

Updated : Nov 26, 2019, 1:56 PM IST

मुंबई - २६ नोव्हेंबर २०१९ला आपली राज्यघटना स्वीकारून ७० वर्षे पूर्ण होतील. याच दिवशी, १९४९ला भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला होता. या घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी, चार वर्षांपूर्वी (२०१५) पासून सरकारने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले. याच निमित्ताने 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची विशेष मुलाखत घेतली आहे.

संविधान दिनानिमित्त, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, प्रकाश आंबेडकर यांची विशेष मुलाखत..

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू. भारतीय संविधान दिनानिमित्त, ईटीव्ही भारतशी बोलताना प्रकाश यांनी म्हटले, की बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणामुळेच असे संविधान लिहिले गेले, जे आज ७० वर्षांनंतरही लागू होत आहे. आजच्या पिढीशी आणि मागील पिढीशीही ते समरूप होते आहे. आजच्या पिढीच्या समस्यांना न्याय, आणि त्यांना आपले मत मांडण्याचा हक्क देते आहे.

यासोबतच, गेल्या 70 वर्षांत अनेक वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटनेत एकाही घटना दुरुस्तीची काहीही गरज नव्हती राज्यकर्त्यांचे अपयश लपवण्यासाठी या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या, अशी खंत देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केली. घटना बदलून 'जीएसटी' आणली, उद्या 'जीएसटी' बदलायची आहे परत घटना बदलावी लागेल असेही आंबेडकर उपहासाने म्हणाले.

राज्यघटनेत प्रत्येकालाच काही ना काही देण्यात आले आहे. सर्वांना अधिकार आणि आपला आवाज उठवण्याची संधी देण्यात आली आहे. राज्यघटनेमुळेच अल्पसंख्याकांना आपल्या देशात कधी असुरक्षित वाटले नाही. आपली घटना ही खेकड्या सारखी आहे. एकट्याला नाही, तर सर्वांना सोबतच घेऊन पुढे जाते, असेही आंबेडकर पुढे म्हणाले.

राज्य घटनेमुळे हुकूमशाहीला नाही तर लोकशाहीला पूरक असे वातावरण निर्माण करण्यात आले, ही या राज्य घटनेची खुबी आहे. बाबासाहेबांना देशात जो मानवतावाद आणायचा होता, त्यादृष्टीने त्यांनी घटनेची रचना केली होती. घटनेच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार दिला. पारंपारिक कायदे असणाऱ्या जाती समूहाला देखील बाबासाहेबांनी 'कॉमन सिव्हिल कोर्ट' दिले. कॉमन सिविल कोर्ट जरी आले, तरी इथल्या जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि मुस्लिम या अल्पसंख्यांकांना धक्का लागणार नाही याचे प्रावधान करण्यात आले होते. देशाला कायद्याच्या चौकटीत ठेवण्याचे महत्त्वाचे काम राज्यघटना करते, अशी माहितीही आंबेडकरांनी दिली.

हेही वाचा : संविधानाच्या बांधणीत डॉ. राजेंद्र प्रसादांचे योगदान..

Intro:Body:

मुंबई - २६ नोव्हेंबर २०१९ला आपली राज्यघटना स्वीकारून ७० वर्षे पूर्ण होतील. याच दिवशी, १९४९ला भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला होता. या घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी,  चार वर्षांपूर्वी (२०१५) पासून सरकारने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले. याच निमित्ताने, ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू. भारतीय संविधान दिनानिमित्त, ईटीव्ही भारतशी बोलताना प्रकाश यांनी म्हटले, की बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणामुळेच असे संविधान लिहिले गेले, जे आज ७० वर्षांनंतरही लागू होत आहे. आजच्या पिढीशी आणि मागील पिढीशीही ते समरूप होते आहे. आजच्या पिढीच्या समस्यांना न्याय, आणि त्यांना आपले मत मांडण्याचा हक्क देते आहे.

राज्यघटनेत प्रत्येकालाच काही ना काही देण्यात आले आहे. सर्वांना अधिकार आणि आपला आवाज उठवण्याची संधी देण्यात आली आहे. राज्यघटनेमुळेच अल्पसंख्याकांना आपल्या देशात कधी असुरक्षित वाटले नाही. आपली घटना ही खेकड्या सारखी आहे. एकट्याला नाही, तर सर्वांना सोबतच घेऊन पुढे जाते, असेही आंबेडकर पुढे म्हणाले.

राज्य घटनेमुळे हुकूमशाहीला नाही तर लोकशाहीला पूरक असे वातावरण निर्माण करण्यात आले, ही या राज्य घटनेची खुबी आहे. बाबासाहेबांना देशात जो मानवतावाद आणायचा होता, त्यादृष्टीने त्यांनी घटनेची रचना केली होती. घटनेच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार दिला. पारंपारिक कायदे असणाऱ्या जाती समूहाला देखील बाबासाहेबांनी 'कॉमन सिव्हिल कोर्ट' दिले. कॉमन सिविल कोर्ट जरी आले, तरी इथल्या जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि मुस्लिम या अल्पसंख्यांकांना धक्का लागणार नाही याचे प्रावधान करण्यात आले होते. देशाला कायद्याच्या चौकटीत ठेवण्याचे महत्त्वाचे काम राज्यघटना करते, अशी माहितीही आंबेडकरांनी दिली.

Conclusion:
Last Updated : Nov 26, 2019, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.