मुंबई - लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि पुणे पोलिसांच्या पथकाने पुण्यातील विमानतळ परिसरात बनावट नोटांचा साठा करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. या कारवाईत 44 कोटी किमतीचे बनावट भारतीय चलन आणि 4 कोटी 20 लाख रुपये विदेशी बनावटीचे चलन जप्त करण्यात आले... चीनचे राष्ट्रपती आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक यांनी संपूर्ण जगाविरोधात कट रचत, जगात कोरोना विषाणूचा फैलाव केला आहे, असा आरोप करत बिहारच्या एका वकिलाने त्यांच्याविरोधात एक याचिका दाखल केली आहे...काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- पुणे - लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि पुणे पोलिसांच्या पथकाने पुण्यातील विमानतळ परिसरात बनावट नोटांचा साठा करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी एका लष्करी जवानासह सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत 44 कोटी बनावट भारतीय चलन आणि 4 कोटी 20 लाख रुपये विदेशी बनावटीचे चलन जप्त करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी शेख अलीम गुलाब खान, सुनील भद्रीनाथ सारडा, रितेश रत्नाकर, तोफिल अहमद मोहमद इसाक खान, अब्दुल गणी रेहमतुल्ला खान, अब्दुल रहमान अब्दुल गणी खान यांना ताब्यात घेतले आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सविस्तर वाचा - पुणे विमानतळ परिसरातून बनावट चलन जप्त, नोटांची किंमत 44 कोटी
- पश्चिमी चंपारण - चीनचे राष्ट्रपती आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक यांनी संपूर्ण जगाविरोधात कट रचत, जगात कोरोना विषाणूचा फैलाव केला आहे, असा आरोप करत बिहारच्या एका वकिलाने त्यांच्याविरोधात एक याचिका दाखल केली आहे. ही याचिका बेतिया न्यायालयाच्या मुराद अली नावाच्या वकिलांनी दाखल केली. महत्वाची बाब म्हणजे, त्यांच्या या याचिकेचा स्वीकार सीजेएम न्यायालयाने केला आहे.
सविस्तर वाचा - कोरोना पसरवला : चीनच्या राष्ट्रपतींसह WHO च्या संचालकाविरोधात याचिका दाखल; मोदी, ट्रम्प साक्षीदार
- श्रीनगर (जम्मू आणि काश्मिर) - बडगाम जिल्ह्यामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये आज (गुरुवारी) तासांपूर्वी चकमक सुरू झाली. जम्मू आणि काश्मिर पोलिसांना बडगामच्या पाथनपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना शोधण्याची पोलिसांनी मोहीम हाती घेतली. पोलिसांची एक तुकडी संबंधीत ठिकाणी पोहोचल्यानंतर चकमक झाली. आता मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सविस्तर वाचा - जम्मू-काश्मिरच्या बडगाममध्ये पोलीस-दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
- मुंबई - बंगालच्या उपसागराच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या २४ तासात ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त स्कायमेट या खासगी हवामानविषयक संस्थेने दिले आहे. निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे आवश्यक स्थिती निर्माण झाल्यास मान्सून कधीही महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा - खुशखबर.. येत्या २४ तासात मान्सून राज्यात धडकण्याची शक्यता
- गोंदिया : संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाला हरवण्यात गोंदिया जिल्ह्याला यश मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले सर्व ६९ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी अर्जुनी/मोरगावमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज मिळाला, आणि कोरोना हरला.
सविस्तर वाचा - कोरोना हरला, गोंदिया जिंकला; आज शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला..
- हैदराबाद : २५ मे रोजी फ्लाॅईड यांना मिनेसोटाच्या मिनिआपोलीसमध्ये एका दुकानाबाहेर अटक केली होती. तिथे डेरेक शाॅविन या पोलीस अधिकाऱ्याने अक्षरश: नऊ मिनिटे फ्लाॅईड यांच्या मानेवर आपला गुडघा दाबून धरला होता. फ्लाॅईड सारखे म्हणत होते की, मी श्वास घेऊ शकत नाही. नंतर रुग्णालयात नेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर अमेरिकन राज्यात कोविड १९ची महामारी असतानाही आफ्रिकन अमेरिकन आणि कृष्णवर्णीय समाज यांच्या न्याय-हक्कांसाठी तीव्र लढा सुरू झाला. मंगळवारी फ्लाॅईड यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मृत्यूनंतर त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी अमेरिकेत शतकानुशतके कृष्णवर्णीय समाजाने केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. या अंत्यविधीच्या वेळी अमेरिकेतले गुलामीचे युग आणि नागरी हक्क चळवळ याचेही स्मरण अनेकांना झाले.
सविस्तर वाचा - निक्सनच्या पावलावर पाऊल ठेवत ट्रम्पही वापरू शकतात 'कायदा-सुव्यवस्था' कार्ड!
- नाशिक : गुरुवारपासून शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील दुकाने व व्यावसायीक आस्थापनांना वेळेचे बंधन किंवा मर्यादा असणार नाही. यासोबतच सम-विषम हा नियम किराणा दुकाने, मेडिकल्स व वैद्यकीय सेवांना लागू नसणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बैठकीत बुधवारी हे निर्णय घेण्यता आले आहेत.
सविस्तर वाचा - नाशिकमधील किराणा दुकानांना नसणार वेळेचे बंधन; 'सम-विषम'मधूनही होणार सुटका..
- जालंधर (पंजाब) - आईने आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याची घटना सोमवारी पंजाबच्या सोहल जागीर या गावात घडली आहे. स्वयंपाकगृहातील चाकूने मुलाचा खून केल्यानंतर आईने घरावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ती जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो चिमुकला आईपेक्षा जास्त आपल्या आजीसोबत राहायचा. म्हणून तिने त्याचा खून केला असल्याचे कारण समोर येत आहे.
सविस्तर वाचा - धक्कादायक..! क्षुल्लक कारणावरून आईने केला सहा वर्षांच्या चिमुकल्याचा खून
- नवी दिल्ली - आमिर खानच्या थ्री-इडियट्स सिनेमामधील 'फुंगसुक वांगडू'ची प्रेरणा असलेले सोनम वांगचुक यांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली. चीन सध्या भारतात करत असलेली घुसखोरी, आणि त्याला उत्तर म्हणून आपण चीनी वस्तूंचा वापर टाळण्याचे करत असलेले आवाहन याबाबत त्यांनी चर्चा केली. पाहूयात त्यांची ही विशेष मुलाखत...
सविस्तर वाचा - EXCLUSIVE : 'बॉयकॉट मेड इन चायना' मोहीमेबाबत सोनम वांगचुक यांची विशेष मुलाखत..
- लंडन - स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू, २० ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी रॉजर फेडरर याच्या गुडघ्याच्या जखमेवर शस्त्रक्रिया झाली आहे. तो २०२० या वर्षामधील एकही स्पर्धा खेळू शकणार नाही. तो पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये कोर्टवर पुन्हा उतरण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा - टेनिस चाहत्यांना मोठा धक्का, गुडघ्याच्या जखमेमुळे फेडरर वर्षभरासाठी बाहेर