ETV Bharat / bharat

Top 10 @ 9 PM : रात्री नऊच्या ठळक बातम्या! - नऊच्या बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

ETV Bharat Maharashtra top 10 news at 9 PM
Top 10 @ 9 PM : रात्री नऊच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 10, 2020, 9:06 PM IST

  • नवी दिल्ली - देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. १२ मेनंतर ही वाहतूक सुरू होणार आहे. सुरुवातीला दिवसाला केवळ १५ गाड्या धावणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सविस्तर वाचा - प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू होणार, '१२ मे'नंतर दिवसाला १५ गाड्या सोडण्याचा मंत्रालयाचा मानस..

  • मुंबई - येथील आर्थर रोड कारागृहात 77 कैदी व 26 जेल कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर यात आणखीन भर पडत नवीन 81 कैद्यांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे जेल प्रशासनाने कारागृहाताच या कैद्यांचे विलगिकरन करून उपचार करण्यास सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा - मुंबई - आर्थररोड कारागृहातील आणखी 81 कैद्यांना कोरोनाची लागण

  • मुंबई - मुंबईतील भायखळा येथील महिला कारागृहात एका 54 वर्षीय महिला कैदीचासुद्धा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आढळल्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा - भायखळा महिला कारागृहातही कोरोनाचा शिरकाव, एक महिला कैदी बाधित

  • कोल्हापूर - पाण्यासाठी दोन गावांमधील ग्रामस्थांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाटणे आणि जेलूगडे अशी या गावांची नावे आहेत.

सविस्तर वाचा - पाण्यासाठी दोन गावांतील ग्रामस्थांमध्ये दगडफेक; चंदगड तालुक्यातील घटना

  • मुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना मृतदेहांच्या बाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. असाच प्रकार आता पालिकेच्या परेल येथील केईएम रुग्णालयातही होत असल्याचे एका व्हिडीओ द्वारे समोर आले आहे. या बाबत रुग्णालयाचे डिन यांच्या बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बरोबर संपर्क होवू शकला नाही.

सविस्तर वाचा - धक्कादायक! केईएम रुग्णालयातही कोरोना मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार?

  • बुलडाणा - कोरोना विरोधात बुलडाणा जिल्हा प्रशासनाच्या झुंजीला यश आले आहे. आरोग्य यंत्रणेच्या पॉझिटिव्हीटीपुढे कोरोना निगेटिव्ह झाल्याचे समोर आले. जिल्ह्यातील 3 कोरोनाच्या रुग्णांना ठणठणीत बरे झाल्यानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बुलडाणा जिल्हा सध्या तरी कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात 23 कोरोनाग्रस्त होते. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर वाचा - दिलासादायक..! बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त, आतापर्यंत सर्व २३ रूग्णांना डिस्चार्ज

  • हिंगोली - 'सोबत जग अथवा सोबत मरू' अशा प्रेमाच्या शपथा घेतलेल्या दोन प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंढा नागनाथ तालुक्यात घडली आहे. दोघांच्याही लग्नाला घरातून विरोध होता. शेवटी या दोघांनीही सोबत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा - लग्न कसं शक्य म्हणून सर्वांचा होता विरोध.. शेवटी 'त्यांनी' उचलले टोकाचे पाऊल

  • रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरली. मालगाडी तुर्भेवरून गोव्याच्या दिशेने जात होती. ही घटना दिवाणखवटी पासून ३ किलोमीटर पुढे घडली. अपघातात मालगाडीचे एकूण ९ डबे रुळावरून घसरले आहेत. रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत.

सविस्तर वाचा - कोकण रेल्वे मार्गावर रुळावरून घसरली मालगाडी; ९ डब्ब्यांना नुकसान

  • पुणे - पुण्यातील 69 भागात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्यामुळे हे भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. पुण्यातील इतर भागात लॉकडाऊन आणि संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. परंतु कंटेन्मेंट झोनमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सकाळी 10 ते 2 वेळेतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.

सविस्तर वाचा - पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने पुढील सात दिवस बंद..!

  • जळगाव - विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक होतो. प्रदेश कार्यकारिणीकडून माझ्या नावाची शिफारस देखील करण्यात आली होती. मात्र, पक्षाकडून संधी मिळाली नाही. ज्यांचा पक्षाशी काही संबंध नाही, ज्यांनी पक्षविरोधात काम केले, अशा लोकांना संधी देऊन निष्ठावंतांवर पक्षाने अन्याय केला आहे.

सविस्तर वाचा - 'कोरोनाचे संकट जाऊ द्या, त्यानंतर भाजपविषयी योग्य निर्णय घेऊ"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.