ETV Bharat / bharat

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : कर्नाटकात अडकेल्या केरळच्या शेतमजुरांचा प्रश्न सोडविण्यास सुरूवात - केरळ सरकार बातमी

केरळचे परिवहन मंत्री ए. के शशीधरण यांनी या प्रकरणी लक्ष घातले आहे. या मजूरांना कर्नाटकातील ग्रामीण नागरिकांकडून तसेच पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. ईटीव्ही भारतने कामगारांची अवस्था समोर आणली.

ETV IMPACT STORY
केरळ परिवहन मंत्री
author img

By

Published : Apr 26, 2020, 6:23 PM IST

तिरुवनंतपूरम - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक स्थलांतरित कामगार, मजूर देशातील विविध राज्यांमध्ये अडकले आहेत. कर्नाटकातील ग्रामीण भागात मूळचे केरळमधील अनेक शेतमजूर अ़डकून पडले आहेत. ईटीव्ही भारतने कामगारांची दयनीय अवस्था समोर आणल्यानंतर केरळ सरकारने मजूरांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

केरळचे परिवहन मंत्री ए. के शशीधरण यांनी या प्रकरणी लक्ष घातले आहे. या मजूरांना कर्नाटकातील ग्रामीण नागरिकांकडून तसेच पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. ईटीव्ही भारतने कामगारांची अवस्था समोर आणली. त्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. केरळच्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार होता, असा अपप्रचार त्यांच्याविरुद्ध स्थानिक करत आहे. याची दखल केरळ सरकारने गांभीर्याने घेतली आहे.

मजुरांना सहन करावा लागणारा त्रास कर्नाटक सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. या प्रकरणी मैसूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच तेथील पोलीस अधीक्षकांशीही चर्चा करण्यात आली आहे, असे वायनाडच्या जिल्हाधिकारी आदिला अब्दुल्ला यांनी सांगितले.

दोन्ही राज्याच्या मुख्यसचिवांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. केरळचे मुख्य सचिव टॉम जोस हे कर्नाटकच्या मुख्य सचिवांशी चर्चा करणार आहेत. कोरोनामुळे सगळीकडे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांना माघारी आणणे शक्य होत नाही, असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.