तिरुअनंतपूरम- भारतात हाहाकार माजवलेल्या कोविड -19 या साथीचा रोगासाठी देशभरातील नागरिक लढाई देत आहेत. मात्र, कोरोना विरुद्धच्या लढाईत डाॅक्टस, पोलीस, यांची भूमिका ही महत्वाची आहे. मुंबई येथून शिक्षण पूर्ण केलेल्या आयपीएस ऐश्वर्या डोंगरे या केरळमधील शांघुमुघममध्ये सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या शांधुमुघम येथे महत्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोना व्हायरस साथीच्या आजारात लॉकडाऊन दरम्यान परिस्थिती कशा हाताळत आहेत याबाबत त्यांनी ईटीव्ही भारतशी विशेष बातचीत केली आहे.
हेही वाचा- कोरोनाविरुद्ध लढतायेत हे 'मराठी योद्धे', देशभर होतंय कौतुक
शांघुमुघममध्ये परप्रांतीय कामगारांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी ऐश्वर्या यांनी भेट दिली. 600 ते 800 कामगार शांघुमुघम अडकले आहेत. त्याच्यासोबत ऐश्वर्या यांनी एक तास चर्चा करुन त्यांना कोरोना बाबत जागृतीची माहिती दिली. त्यांच्या समस्या, समजून घेऊन त्यावर काय उपाय करता येईल याबाबत चर्चा केली. ऐश्वर्या सांगतात, कामगारांना भेटण्यासाठी गेल्यावर त्यांनी आमचे आभार मानले. त्यांनी आमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा आनंद झाला. हे माझ्यासाठी एक उपलब्धीच आहे.
ऐश्वर्या यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून (मुंबई) इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स विषयातील पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत पास केली. त्यांनतर तिरुअनंतपुरममध्ये त्यांना पहिली पोस्ट मिळाली. आता त्या मल्याळम शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत.