ETV Bharat / bharat

'चांद्रयान-१' चे प्रोजेक्ट संचालक काय म्हणतात? 'चांद्रयान-२' विषयी... - एम. अण्णाधारी

भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ शनिवारी चंद्रावर उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर, चांद्रयान-१ मोहिमेचे प्रोजेक्ट संचालक एम. अण्णादुरई यांची 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने मुलाखत घेतली आहे.

exclusive interview of M annadhari
author img

By

Published : Sep 5, 2019, 8:16 PM IST

Updated : Sep 6, 2019, 10:23 PM IST

बंगळुरू - भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-२ आता अखेरच्या टप्प्यात आहे. शनिवार, ७ सप्टेंबरला चांद्रयान-२ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि एकूण भारतासाठीच हा एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण असणार आहे.

याआधी झालेल्या चांद्रयान-१ या मोहिमेचे प्रोजेक्ट संचालक, एम. अण्णादुरई यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चांद्रयान-१, चांद्रयान-२ आणि मंगळयान या इस्रोच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांबद्दल, तसेच इस्रोच्या पुढील योजनांबाबत चर्चा केली आहे. यावेळी बोलताना, ज्येष्ठ वैज्ञानिक एम. अण्णादुरई यांनी पुढील माहिती दिली...

१) आपण चांद्रयान-१ चे प्रोजेक्ट संचालक होता. आता चांद्रयान-२ मोहीम सुरु आहे. या दोन्ही मोहिमांमधील फरक काय आहे?
: चांद्रयान- १ हे ऑर्बिटर होते. ते चंद्राच्या भोवताली प्रदक्षिणा घालत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करत होते. चांद्रयान-२ मात्र चंद्रावर उतरून संशोधन करणार आहे...

'चांद्रयान-१' चे प्रोजेक्ट संचालक

२) चांद्रयान-१ ने जी कामगिरी केली, त्यावर तुम्ही समाधानी होता?
: अगदी. चांद्रयान-१ चे यश हे अपेक्षेपलीकडील यश होते. चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे चांद्रयान-१ नेच मिळविले होते. चांद्रयान-१ च्या इतर अनेक शोधांपैकी हा शोध संपूर्ण जगासाठी सर्वात महत्त्वाचा होता. चांद्रयान-२ हे आता याबद्दल अधिक प्रमाणात संशोधन करेल...

'चांद्रयान-१' चे प्रोजेक्ट संचालक

३) चांद्रयान-२ ने आतापर्यंत पृथ्वीची तसेच चंद्राची अनेक छायाचित्रे पाठवली आहेत. त्याबद्दल काय सांगाल?
: ही छायाचित्रे नक्कीच विस्मयकारक आहेत. मात्र, ही छायाचित्रे या गोष्टीचा पुरावा आहेत, की चांद्रयान-२ हे आपल्या निर्देशित पथावरून जात आहे. लँडिंगच्या ठिकाणी जाईपर्यंत चांद्रयानाला रस्त्यात कोणकोणते टप्पे आले पाहिजेत हे पूर्वनियोजित असते. त्याच गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी चांद्रयान ही छायाचित्रे पाठवते...

'चांद्रयान-१' चे प्रोजेक्ट संचालक

४) चंद्रावर उतरण्यासाठी आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचीच का निवड केली?
: चांद्रयान-१ ने दक्षिण ध्रुवावरच पाण्याचा अंश असल्याचा शोध लावला होता. त्यानंतर, संपूर्ण जगाचे लक्ष चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे वेधले गेले. भविष्यात जेव्हा कधी पुन्हा माणूस चंद्रावर पाठवण्यात येईल, तेव्हा तो दक्षिण ध्रुवावरच उतरण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे, चांद्रयान-२ हे दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे...

'चांद्रयान-१' चे प्रोजेक्ट संचालक

५) चांद्रयानाचे विक्रम लँडर हे चंद्रावर १ लूनार दिवस, म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवस इतका काळ असणार आहे. चंद्रावर संशोधन करण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे?
: विक्रम रोव्हर जेव्हा चंद्रावर उतरेल, तेव्हा ते एका ठराविक कक्षेमध्ये राहूनच चंद्रावर संशोधन करु शकणार आहे. यापेक्षा दूर जाताच त्याचा चांद्रयानाशी संपर्क तुटण्याची भीती आहे. त्यामुळे जेवढ्या भागात ते रोव्हर फिरू शकेल, तेवढ्या भागाचा अभ्यास करण्यासाठी १४ दिवस हे पुरेसे आहेत...

'चांद्रयान-१' चे प्रोजेक्ट संचालक

६) भारतातील वैज्ञानिक चांद्रयान-२ च्या लँडिंगकडे कसे पाहत आहेत?
: देशातील तरुण वैज्ञानिक या घटनेचे साक्षीदार बनण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. याआधीची पिढी बऱ्याच अवकाश यात्रांची साक्षीदार आहे. मात्र, आजच्या पिढीने असे काही अनुभवले नाही. याचा नक्कीच पुढच्या पिढीवर प्रभाव पडून, त्यांना यातून प्रेरणा मिळणार आहे...

'चांद्रयान-१' चे प्रोजेक्ट संचालक

७) चांद्रयान-२ नंतर इस्रोच्या भविष्यातील योजना काय असतील?
: इस्रो हे नेहमीच समाजाचा विचार करते. अवकाश संशोधनाचा समाजासाठी कसा वापर करण्यात येता येईल याला इस्रो प्राधान्य देते. यासोबतच, चांद्रयान-२ ला परत आणण्याची योजना आहे. तसेच, २०२२ ची महत्त्वाकांक्षी गगनयान योजना आहे, आदित्य मिशन आहे, तसेच मंगलयान-२ चा देखील विचार सुरु आहे...

'चांद्रयान-१' चे प्रोजेक्ट संचालक

हेही वाचा : मोटार वाहन कायद्याचा झटका, रिक्षाचालकाला तब्बल ४७,५०० रुपयांचा दंड

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 6, 2019, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.