तिरुवअनंतपूरम - गर्भवती हत्तीणी प्रकरणावरुन खोट्या आणि चुकीच्या माहितीवरून केंद्रीय मंत्र्याकडून तिररस्कारांचं अभियान राबवण्यात येत असल्याचा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला आहे. यातून केरळची आणि मलप्पूरमची प्रतिमा मलिन करण्यात असल्याचे ते म्हणाले.
मेनका गांधी यांनी गैरसमजूतीतून काही माहिती जाहीर केली असती तर त्यांनी चूक दुरुस्त केली असती. मात्र, चूक दुरुस्त करण्याची त्यांची इच्छा नाही. त्यावरून हे अभियान खोट्या माहितीवर आधारित असून जाणूनबुजून केरळची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे विजयन म्हणाले.
केरळचा स्वाभिमान दुखावण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. मानव आणि प्राण्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. हत्तीण प्रकरणावरून खोट्या माहितीवर आधारित काहीजण केरळवर आरोप करत असल्यावरून विजयन यांनी ट्विटवरूनही प्रतिक्रीया दिली आहे.
संतत्त झालेल्या विजयन यांनी ट्विटरवरून म्हटले की, 'चुकीच्या माहितीवरून खोटे पसरवि्ण्यात येत आहे. काही जण तर या मुदद्यावरून कट्टरतावाद पसरविण्याच प्रयत्न करत आहेत. चुकीच्या गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाचं यशस्वी व्यवस्थापन केल्यामुळे सगळीकडून केरळची प्रशंसा होत आहे. मात्र, राज्याविरोधात तिरस्कार पसरून प्रतिमा मलिन करण्याच कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांचा एक भ्रम आहे, असे विजयन म्हणाले.