ETV Bharat / bharat

धक्कादायक : अतिदक्षता विभागाला कुलूप, उपचाराविना महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू - कोरोना की जद में उज्जैन

उज्जैन येथे अतिदक्षता विभागाला टाळे असल्याने एका 55 वर्षीय महिला मृत्यू झाला आहे.

रुग्णवाहीेकतील रुग्ण
रुग्णवाहीेकतील रुग्ण
author img

By

Published : Apr 5, 2020, 12:23 PM IST

भोपाल - येथील उज्जैन शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकरा घडला आहे. येथील अतिदक्षता विभागाला कुलुप असल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उज्जैन येथील लक्ष्मीबाई (वय 55 वर्षे) यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांना उपचारासाठी शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. पण, अतिदक्षता विभागा कुलूप होता. अर्ध्या तासानंतरही कोणीच उपचारासाठी आले नाही. अखेर त्या महिलेच्या कुटुंबियांनी अतिदक्षता विभागाला लागलेले कुलुप तोडले. पण, वेळेव उपचार न झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला.

रुग्णवाहीकेतच मोजल्या शेवटच्या घटका

श्वसनाचा त्रास होताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना माधव नगर येथील रुग्णालायत दाखल केले होते. पण, कोरोनाचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केल्याने लक्ष्मीबाईंना मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी नेण्यात आले. पण, अतिदक्षता विभागाला कुलुप असल्यांने त्यांना रुग्णवाहीकेतच ठेवण्यात आले. व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णावाहीकेतच त्यांनी आपल्या शेवटच्या घटका मोजल्या.

याबाबत आरोग्य अधिकारी अनुसिया गवली यांना विचारणा केली असता त्यांनी घटनेची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.

हेही वाचा - सलाम..! कोरोनाशी लढण्यासाठी 101 वर्षीय आजीची 1 लाख 6 हजारांची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.