रायपूर (छत्तीसगढ)- कोरोना विषाणूमुळे देशाभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य अद्याप कळले नसल्याचे दिसून आले आहे. ही लोक विनाकारणच रस्त्यावर फिरतात. त्यांना पोलिसांकडून चोप मिळतो, तरी देखील ते जुमानत नाही. त्यामुळे, काशीराम नगर येथील अख्तर हुसैन कुरैशी हे शहरातील चौका चौकात फिरून लोकांना घरी राहण्याचे आवाहन करत आहे.
अख्तर कुरैशी (वय.५२) रोज सकाळी १० वाजता हातात तिरंगा घेऊन घरा बाहेर निघतात. ते शहरातील मुख्य चौकात जाऊन लोकांना लॉकडाऊनचे पालन करण्याची विनंती करतात. या वेळी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून, घरीच राहून आपण कोरोनापासून आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करू शकतो, असे अख्तर कुरैशी यांनी सांगितले.
हेही वाचा- पंतप्रधान साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद; 'लॉकडाऊन'बाबत होणार निर्णय..