ETV Bharat / bharat

खत घोटाळ्याप्रकरणी अशोक गेहलोत यांच्या भावाला ईडीने बजावले समन्स

राजस्थानमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ईडीने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांना खत घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे.

गेहलोत
गेहलोत
author img

By

Published : Jul 29, 2020, 10:47 AM IST

नवी दिल्ली - राजस्थानमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ईडीने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांना खत घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. चौकशीसाठी बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी खत घोटाळ्याप्रकरणी ईडीने देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. राजस्थानमध्येही छापे टाकले गेले. यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे बंधू अग्रसेन गेहलोत यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. तिथे बरीच कागदपत्रे ईडीने हस्तगत केली. त्याप्रकरणीच आज चौकशी केली जाणार असल्याची शक्यता आहे.

अग्रसेन गेहलोत खताचा व्यवसाय करतात. जोधपुरमध्ये त्यांची खताशी संबंधित दुकाने व इतर प्रतिष्ठान आहेत. अग्रसेन यांच्या अनुपम कृषी कंपनीवर खतांच्या निर्यातीत फेरफार केल्याचा आरोप आहे. अग्रसेन यांची कंपनी अनुपम कृषीने शेतकऱ्यांच्या नावे सवलतीच्या दरात खत घेऊन ते इतर देशांना विकल्याचा आरोप आहे.

अग्रसेन यांनी 2007 ते 2009 दरम्यान क्लोराईड पोटॅश हे सरकारची मंजूरी ने घेता परदेशात विकले. त्यांना भारतात शेतकऱ्यांना क्लोराईड पोटॅश विकण्याचा परवाना होता. पोटॅश भारताबाहेर पाठविण्यावर बंदी असतानाही त्याची निर्यात अग्रसेन यांनी केली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.