ETV Bharat / bharat

INX मीडिया खटला : तिहार तुरुंगात चौकशी केल्यानंतर ईडीने चिदंबरम यांना केली अटक - मनी लाँड्रींग बातमी

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली आहे.

पी. चिदंबरम
author img

By

Published : Oct 16, 2019, 11:51 AM IST

Updated : Oct 16, 2019, 1:24 PM IST

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली आहे. काल (मंगळवार) विशेष न्यायलयाने ईडीच्या तीन तपास अधिकाऱ्यांना मनी लाँड्रींग खटल्याप्रकरणी चिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.

दिली न्यायालयाच्या सुचनेनुसार आम्ही याप्रकरणी चौकशी करत आहोत, असे तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तिहार तुरुंगामध्ये आज (बुधवार) सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांची चौकशी केली. पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. २१ ऑगस्टला अटक करण्यात आल्यानंतर चिदंबरम ५५ दिवस न्यायालयीन कोठडीत आहेत. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 'फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा'मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

  • Delhi: Enforcement Directorate (ED) officials leave from Tihar Jail after interrogating Congress leader P Chidambaram. Yesterday, a special court had allowed 3 ED officials to interrogate P Chidambaram in INX media money laundering case. Currently, he is in judicial custody. pic.twitter.com/cKRI8QgOdc

    — ANI (@ANI) October 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरण?

आयएनएक्स माध्यम व्यवहार पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ मध्ये झाला होता. यामध्ये आयएनएक्स या माध्यम समूहाला ३०५ कोटींची परदेशी गुंतवणूक मिळवून देण्यासाठी ' फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड' तर्फे मंजुरी देण्यात आली होती. ही मंजुरी देताना गैरव्यवहार केल्याचा ठपका चिदंबरम यांच्यावर आहे. १५ मे २०१७ ला सीबीआयने याप्रकरणी खटला दाखल केला आहे. तर २०१८ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीगचा खटला दाखल केला आहे.

Intro:Body:

national marathi

Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.