ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश : कमलनाथांना 'आयटम' प्रकरण भोवले, निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकावरून हटवले - इमरती देवी प्रकरण

राज्य निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा 'स्टार' प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. निवडणूक आचार संहितेचे सतत उल्लंघन केल्यामुळे ही कारावाई केल्याचे आयोगाने म्हटले आहे.

कमलनाथ
कमलनाथ
author img

By

Published : Oct 30, 2020, 9:15 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणुका होणार असून प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. मात्र, त्याआधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राज्य निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा 'स्टार' प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी आचारसंहितेचे सतत उल्लंघन केल्याचे म्हणत आयोगाने कारवाई केली.

'आयटम' प्रकरणी सापडले होते वादात

राज्यातील डबरा मतदारसंघात एका सभेदरम्यान कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना 'आयटम' म्हटले होते. या वक्तव्यानंतर कमलनाथ यांच्यावर मोठी टीका झाली होती. भाजपाने या वक्तव्यावरून काँग्रेसची कोंडी केली होती. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पत्र लिहून निषेध व्यक्त केला होता. महिलांबाबत काँग्रेसची अशी मानसिकता असल्याचे मुख्यमंत्री चौहान म्हणाले होते. तसेच निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी तक्रार करण्यात आली होती.

कमलनाथ यांची प्रतिक्रिया

इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागणार नाही. माझे वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेण्यात आल्याचे कमलनाथ म्हणाले. राहुल गांधींनीही कमलनाथ यांच्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त केली होती.

मध्यप्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणुका आहेत. भाजपाला बहुमतासाठी आठ जागा हव्या असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षातून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत २० पेक्षा जास्त आमदारांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार कोसळले. राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्तेत आली. त्यामुळे आता भाजपा सरकार खाली खेचण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.