ETV Bharat / bharat

झारखंड विधानसभा निवडणूक : पाच टप्प्यात मतदान, 23 डिसेंबरला निकाल - झारखंडमध्ये पाच टप्प्यांत मतदान

'राज्यातील 19 जिल्हे आणि 67 विधानसभा जागा माओवादी प्रभावित भागांत मोडतात. यातील 13 जिल्हे अतिसंवेदनशील आहेत. या भागांमध्ये कडक सुरक्षेचा बंदोबस्त केला जाईल. आयोगाने दोन दिवसांत झारखंडचा आढावा घेतला,' असे अरोरा यांनी सांगितले.

सुनील अरोरा
author img

By

Published : Nov 2, 2019, 11:34 AM IST

नवी दिल्ली - भारतीय निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. झारखंडमध्ये 81 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 23 डिसेंबरला मतमोजणी होईल.

पहिला टप्पा : 13 जागा - 30 नोव्हेंबर

दुसरा टप्पा : 20 जागा - 7 डिसेंबर

तिसरा टप्पा : 17 जागा - 12 डिसेंबर

चौथा टप्पा : 15 जागा - 16 डिसेंबर

पाचवा टप्पा : 16 जागा - 20 डिसेंबर

झारखंडच्या विधानसभेचा कार्यकाळ 27 डिसेंबरला संपेल. झारखंडमध्ये एकूण 81 विधानसभेच्या जागा आहेत. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहे.

'राज्यातील 19 जिल्हे आणि 67 विधानसभा जागा माओवादी प्रभावित भागात मोडतात. यातील 13 जिल्हे अतिसंवेदनशील आहेत. या भागांमध्ये कडक सुरक्षेचा बंदोबस्त केला जाईल. आयोगाने दोन दिवसांत झारखंडचा आढावा घेतला,' असे अरोरा यांनी सांगितले.

झारखंडमध्ये सध्या मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आहे. त्यांना या खेपेसही सत्तेत येण्याची आशा आहे. भाजपने 2014 विधानसभा निवडणुकांमध्ये 37 जागा जिंकल्या होत्या. तर त्यांच्यासह युतीत असलेल्या ऑल झारखंड स्टूडंट्स युनियनने (एजेएसयू) पाच जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधनला (राजग) सरकार स्थापने साठी ४१ जागांवर विजय मिळवावा लागेल.

नुकत्याच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजप आणि युतीला अपेक्षित प्रमाणात जागा जिंकता आल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये निवडणूक होणार आहे. हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. त्यांना सरकार स्थापनेसाठी जननायक जनता पक्षाचे (जजप) समर्थन घ्यावे लागले.

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी भाजप युतीतील पक्ष शिवसेनेसोबत सत्तासंघर्षात गुंतला आहे. भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सरकार स्थापनेस सक्षम नाही आणि बहुमताच्या आकड्यापासून बराच दूरही आहे.

Intro:Body:

झारखंड विधानसभा निवडणूक : पाच टप्प्यांत मतदान, 23 डिसेंबरला निकाल

नवी दिल्ली - भारतीय निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. झारखंडमध्ये 81 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 23 डिसेंबरला मतमोजणी होईल.

पहिला टप्पा : 13 जागा - 30 नोव्हेंबर

दुसरा टप्पा : 20 जागा - 7 डिसेंबर

तिसरा टप्पा : 17 जागा - 12 डिसेंबर

चौथा टप्पा : 15 जागा - 16 डिसेंबर

पाचवा टप्पा : 16 जागा - 20 डिसेंबर

झारखंडच्या विधानसभेचा कार्यकाळ 27 डिसेंबरला संपेल. झारखंडमध्ये एकूण 81 विधानसभेच्या जागा आहेत. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहे.

'राज्यातील 19 जिल्हे आणि 67 विधानसभा जागा माओवादी प्रभावित भागांत मोडतात. यातील 13 जिल्हे अतिसंवेदनशील आहेत. या भागांमध्ये कडक सुरक्षेचा बंदोबस्त केला जाईल. आयोगाने दोन दिवसांत झारखंडचा आढावा घेतला,' असे अरोरा यांनी सांगितले.

झारखंडमध्ये सध्या मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आहे. त्यांना या खेपेसही सत्तेत येण्याची आशा आहे. भाजपने 2014 विधानसभा निवडणुकांमध्ये 37 जागा जिंकल्या होत्या. तर त्यांच्यासह युतीत असलेल्या ऑल झारखंड स्टूडंट्स युनियनने (एजेएसयू) पाच जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधनला (राजग) सरकार स्थापने साठी ४१ जागांवर विजय मिळवावा लागेल.

नुकत्याच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजप आणि युतीला अपेक्षित प्रमाणात जागा जिंकता आल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये निवडणूक होणार आहे. हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. त्यांना सरकार स्थापनेसाठी जननायक जनता पक्षाचे (जजप) समर्थन घ्यावे लागले.

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी भाजप युतीतील पक्ष शिवसेनेसोबत सत्तासंघर्षात गुंतला आहे. भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सरकार स्थापनेस सक्षम नाही आणि बहुमताच्या आकड्यापासून बराच दूरही आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.