पोर्ट ब्लेअर - अंदमान निकोबार बेटांवर आज (रविवार) ४.३ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी संस्थेने ही माहिती दिली. सायंकाळी ७ वाजता दिगलीपूरपासून ५५ किलोमीटर दक्षिणेला भूंकपाचा केंद्रबिंदू होता. तर जमिनीखाली १० किमी अंतरावर भूकंपाची नाभी होती. या भूकंपात जिवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळाली नाही.
१ डिसेंबरला उत्तराखंड राज्यात झाला भूकंप
उत्तराखंड राज्याला १ डिसेंबरला (सोमवार) ३.९ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबाबतची माहिती दिली. सकाळी ९.४० च्या दरम्यान, हरिद्वार आणि शेजारच्या परिसरासह देहराडून, रुरकी आणि लकसर येथे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे काही काळ नागरिकांत भीती पसरली होती.