शिमला- मंडी येथील आयोजित आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सव प्रदर्शनात शेणापासून तयार केलेल्या चपलांचा स्टाॅल लावण्यात आला होता. या आगळ्यावेगळ्या चपलांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
या चपलांचा शोध हरियाणातील रोहतकच्या वैदिक संस्थेने लावला आहे. आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सवात पशुसंवर्धन विभागाच्या स्टॉलमध्ये या चपलांना स्थान देण्यात आले आहे. वैदिक मलम संस्थेचे मंडी जिल्ह्यातील वितरक करण सिंह यांनी चप्पलांचा स्टाॅल या प्रर्शनात लावला आहे.
या चपलांचे नाव 'गोमय चरण पादुका' असे ठेवण्यात आले आहे. रक्तदाब, मानसिक त्रास, चिडचिडेपणा यासाठी या चपलांचा फायदा होतो, असे करण सिंग यांनी सांगितले.