ETV Bharat / bharat

युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री भारत दोऱ्यावर; डॉ. जयशंकर यांची घेतली भेट - UAE

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर यांनी नहयान यांची भेट घेतली आहे.

युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री भारत दोऱ्यावर
author img

By

Published : Jul 8, 2019, 9:47 PM IST

नवी दिल्ली - संयुक्त अरब अमीरातचे (युएई) परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर यांनी नहयान यांची भेट घेतली आहे.

अल नहयान तीन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करतील. या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांची धोरणात्मक भागिदारी व्यापक आणि मजबूत करण्याचा उद्देश असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले आहे.

भारत आणि संयुक्त अरब अमीरातमध्ये जवळचे संबध आहेत. युएई भारताचा तिसरा व्यापारातील भागिदार आहे. तर चौथा उर्जा पुरवणारा देश आहे. भारत आणि संयुक्त अरब अमीरात दरम्यान ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक, घनिष्ठ आणि बहुआयामी संबंध आहेत. संयुक्त अरब अमीरातीने मार्च 2019 मध्ये ओआईसी परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'गेस्ट ऑफ ऑनर' म्हणूण आंमत्रीत केले होते.

Intro:Body:

Nationl

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.