पाटणा : देशाची राज्यघटना लिहिण्यात ज्या महान व्यक्तींचा सहभाग होता, त्यांपैकी एक म्हणजे देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे, हे विशेष.
मूळ बिहारचे असलेले राजेंद्र प्रसाद हे घटना समितीच्या ३६ सदस्यांपैकी एक. ११ डिसेंबर १९४६ ला, त्यांची या समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मात्र, राज्यघटनेच्या बांधणीमध्ये राजेंद्र प्रसाद यांच्या योगदानाबाबत कोणीही बोलत नाही, अशी खंत प्रसाद यांची नात, तारा सिन्हा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
डॉ. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांच्या आत राज्यघटनेची यशस्वीरित्या रचना करण्यात आली. राज्यघटनेतील पहिली धारणा ही डॉ. प्रसाद यांचीच होती, अशी माहिती सिन्हा यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, की या ऐतिहासिक दस्तावेजाच्या रचनेबाबत सामान्य नागरिकांना अत्यंत कमी माहिती आहे. भारताच्या सर्वोच्च कायद्याची रचना करताना डॉ. प्रसाद यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, त्याबाबत माहिती देताना, प्रसाद यांचा क्वचितच उल्लेख केला जातो याबाबत सिन्हा यांनी निराशा व्यक्त केली.
राजकीय विश्लेषक आणि 'ए. एन. सिन्हा इंस्टिस्ट्यूट फॉर सोशल स्टडीज'चे माजी संचालक डी. एम. दिवाकर सांगतात; की वसाहतीकरणानंतर भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागातील लोकांमध्ये समन्वय घडवून आणणे हे विशेष आव्हान होते. यासंदर्भात डॉ. प्रसाद यांचे योगदान हे अविस्मरणीय आहे. वर्तमान आणि भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन, घटनेची विशिष्ट प्रकारे आखणी केली गेली, आणि हे सर्व प्रसाद यांच्या सहभागामुळेच शक्य झाले.
भारतीय घटनेमध्ये जे काही महत्त्वपूर्ण निर्णय आणि हक्क समाविष्ट केले गेले, ते सर्व डॉ. प्रसाद यांच्या सहमतीने आणि सहभागाने झाले. दिवकर यांचे याबाबत ठाम मत आहे.
राजेंद्र मेमोरिअल संग्रहालयाचे संचालक मनोज वर्मा यांच्या मते, राज्यघटनेच्या बांधणीत इतर सर्व नेत्यांपेक्षा प्रसाद यांचे योगदान सर्वात जास्त होते.
१३ डिसेंबर १९४६ला राज्यघटना लिहिण्यास सुरुवात झाली, आणि डिसेंबर १९४९ मध्ये ती पूर्ण झाली. भारताच्या विधानसभेमध्ये २९२ प्रांत, ९३ राज्ये प्रांताचे तीन मुख्य आयुक्त प्रांत आणि बलुचिस्तान या सर्वांचे एकूण ३८९ प्रतिनिधी सदस्य म्हणून होते. मात्र, फाळणीनंतर मुस्लीम लीगने माघार घेतल्यामुळे एकूण सदस्यसंख्या २९९ वर आली.