ETV Bharat / bharat

कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान काय कराल आणि काय टाळाल! - लॉकडाऊनमध्ये काय टाळाल

लॉकडाऊनचा अर्थ असा की, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पाऊल न टाकणे, बाहेर जाण्याचे प्रमाण कमी करणे आणि अगदीच निकड असेल तेव्हा घरातील केवळ एका सुदृढ सदस्याने घराबाहेर पडणे. जर घरात एखादी अशी व्यक्ती असेल जी खुप आजारी आहे आणि तिला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे, अशावेळी प्रत्येकाला नजीकच्या वैद्यकीय सुविधांची माहिती असणे आवश्यक आहे.

DOs and DONT'S during Covid-19 lockdown!
कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान काय कराल आणि काय टाळाल!
author img

By

Published : Apr 2, 2020, 3:13 PM IST

संपूर्ण जग एका जीवघेण्या महामारीचा सामना करीत असून कोविड-१९ चा प्रसार थोपवण्यासाठी आपल्या सर्वांसाठी हा खरोखर कठीण काळ आहे. कोविड-१९ चा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ मार्च रोजी सुरु झालेल्या २१ दिवसीय देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारा संसर्ग थांबवणे, आपले आणि इतरांचे संरक्षण करणे हा या लॉकडाऊनचा हेतू आहे.

लॉकडाऊनचा अर्थ असा की, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पाऊल न टाकणे, बाहेर जाण्याचे प्रमाण कमी करणे आणि अगदीच निकड असेल तेव्हा घरातील केवळ एका सुदृढ सदस्याने घराबाहेर पडणे. जर घरात एखादी अशी व्यक्ती असेल जी खुप आजारी आहे आणि तिला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे, अशावेळी प्रत्येकाला नजीकच्या वैद्यकीय सुविधांची माहिती असणे आवश्यक आहे. स्वतःला सकारात्मक आणि आनंदी ठेवण्यासाठी विविध मार्गांनी लॉकडाऊनचा उपयोग होऊ शकतो. घरात राहणे कधी कधी कंटाळवाणे आणि बंधनकारक वाटू शकते. मात्र काही वेळा ही गोष्ट अत्यंत मनोरंजकदेखील असू शकते.

लॉकडाऊन कालावधीचा वापर कसा करावा?

या काळात स्वतःला व्यस्त ठेवणे फायदेशीर ठरु शकते. प्रत्येकजण घरात काहीतरी कामांमध्ये स्वतःला गुंतवू शकतो. संगीत ऐकणे, टीव्हीवर मनोरंजक कार्यक्रम पाहिल्यास नकारात्मक विचार टाळण्यास मदत होऊ शकते. दररोज आपल्याला टीव्ही, सोशल मिडीया, वर्तमानपत्रे, कुटुंबीय आणि मित्रांकडून कोरोना विषाणूच्या नव्या प्रकरणांविषयी ऐकायला मिळते ज्यामुळे भीतीदायक परिस्थिती निर्माण होणे साहजिक आहे. यामुळे आपण अस्वस्थ होऊ शकतो, घाबरुन जाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे आपल्या मनात असे विचार येतील, अशा गोष्टी बोलल्या जातील किंवा केल्या जातील ज्या करणे सामान्य परिस्थितीत आपल्याला योग्य वाटणार नाही.

स्वतःला आशावादी आणि आनंदी ठेवण्यासाठी लोक पुन्हा एकदा चित्रकला, बागकाम किंवा शिवणकामासारखे छंद जोपासण्याचा विचार करु शकतात. आरोग्याची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे. यामुळे प्रत्येकाने योग्य आहार घ्यावा आणि मुबलक प्रमाणात द्रव्यपदार्थांचे सेवन करावे. परंतु याचवेळी घरातल्या घरात सोपे व्यायाम करुन स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवणे महत्त्वाचे आहे.

अशा कठीण परिस्थितीत आपण इतरांच्या गरजा आणि इच्छादेखील समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला जर कोणाला सल्ला, अन्न किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंची गरज असेल तर आपण मदत करण्याची तयारी दाखवायला हवी.

ज्या ज्येष्ठ नागरिकांना गोंधळल्यासारखे, हरवल्यासारखे वाटत असून मदतीची आवश्यकता आहे त्यांच्याकडे लक्ष देत त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपण त्यांना आवश्यक असलेली औषधे, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू इत्यादीपैकी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या देऊन त्यांना मदत ऑफर करु शकतो. लहान मुलांसाठीदेखील हा लॉकडाऊनचा काळ अत्यंत उपयुक्त ठरु शकतो आणि या काळात ते नवीन कौशल्यांचे शिक्षण घेऊ शकतात. लहान मुलांना घरामध्ये व्यस्त ठेवता येईल आणि त्यांना घरातील कामांमध्ये सहभागी करुन घेण्यात यावे.

तथ्यांना ‘हो’ आणि अफवांना ‘नाही’

एकीकडे कोविड-१९ च्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, सोशल मिडियावर चुकीची माहिती आणि चुकीच्या बातम्यांचा पूर येऊ लागला आहे. एखाद्या गोष्टीविषयी तुमच्याकडे जेवढी अधिक माहिती असेल, तेवढी तुमची त्याबद्दलची भीती कमी होईल. प्रत्येकाने स्वत:च्या संरक्षणासाठी आपण केवळ माहितीच्या विश्वसनीय स्त्रोतांचा आधार घेत आहोत आणि त्यावरच विश्वास ठेवत आहोत याची खात्री करणे आवश्यक आहे.

स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी आपण खळबळजनक बातम्या किंवा सोशल मिडीया पोस्ट्सचा आधार घेऊ नये. यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे, खात्री करुन तपासून न घेतलेल्या बातम्या शेअर करणे किंवा त्यांचा प्रसार करणेदेखील टाळायला हवे.

कठीण परिस्थितीत प्रत्येकाने स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा आणि तसाच विचार करण्याचा प्रयत्न करायला हवा. कोण आजारी पडत आहे कायमच याचा विचार करण्यापेक्षा कोण बरे झाले आहे याविषयी माहिती घ्यावी. त्याचप्रमाणे, हातांची स्वच्छता आणि इतरांपासून अंतर ठेवणे या माहित असलेल्या उपायांचे पालनदेखील फायद्याचे ठरेल. यामुळे प्रत्येक व्यक्तीला काळजी घेण्यात मदत होईलच आणि इतर लोकदेखील सावधगिरी बाळगतील.

कोविड-१९ चा सामना करण्यासाठी, प्रत्येकाला या रोगाची वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्णन करण्यात आलेली पुरेशी लक्षणे माहीत असणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी शिंकणे, खोकणे किंवा थुंकणे यासारख्या गोष्टी न करण्याच्या शिष्टाचाराचे पालन आवश्यक आहे. परंतु, बहुतांश लोकांमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे सौम्य लक्षणे आढळून येतात आणि त्या व्यक्तीने केवळ सहसा पुढील दोन आठवड्यांसाठी संसर्ग कमी होईपर्यंत सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. सौम्य संसर्ग असल्यास व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. केवळ ज्या व्यक्तींना श्वसनास त्रास होत आहे अशा व्यक्तींनी रुग्णालयात दाखल व्हावे. यामधून बहुतांश रुग्ण बरे होतात.

संयम ठेवा आणि संवाद साधा

अशा परिस्थितीत काही भावनिक समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, काही गोष्टींचे पालन करणे फायदेशीर ठरु शकते. जर अस्वस्थ वाटत असेल, तर काही मिनिटे हळुहळु श्वास घ्यावा. त्याचप्रमाणे, अस्वस्थ करणाऱ्या विचारांपासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या शांत आणि पवित्र गोष्टीविषयी विचार केल्यास मन शांत होण्यास मदत होते. एखाद्या व्यक्तीची चिडचिड होत असल्यास १० पासून १ पर्यंत आकडे मोजल्यास मन शांत होण्यास मदत होते.

एखाद्या व्यक्तीस एकाकीपणा किंवा दुःखी वाटत असेल तर संवाद साधल्याने अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते. संवादामुळे तुम्हाला कुटुंबीय आणि मित्रजनांशी जोडले जाण्यास मदत होईल तसेच दीर्घकाळापासून दुरावलेले मित्र आणि नातेवाईकांशी बोलणदेखील फायद्याचे ठरु शकते. बऱ्याच दिवसांमध्ये ज्यांच्याशी तुमचे काहीच बोलणे झालेले नाही, अशा व्यक्तींबरोबर आनंदी प्रसंग, सामाईक आवडीनिवडी, स्वयंपाकाच्या टिप्स आणि संगीताविषयी चर्चा केलीत, तर तुमच्या मनाला शांतता मिळू शकते.

परंतु, जर एखाद्याच्या भावनांचा कडेलोट झाला आणि त्याला हतबल आणि निराश वाटत असेल, तर हेल्पलाईन क्रमांकावर (080-46110007) संपर्क साधावा. तेथे मानसिक आरोग्य व्यावसायिक किंवा डॉक्टरांकडून सल्ला घेतल्यास भरपूर मदत होईल.

आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्या!

लॉकडाऊनच्या काळात कंटाळा येत असेल तर मद्य किंवा तंबाखूचे सेवन हा पर्याय नाही, ही गोष्ट ध्यानात घेणे गरजेचे आहे. भावना किंवा कंटाळ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी तंबाखू किंवा मद्य किंवा इतर ड्रग्सचा आधार घेतल्यास तुमचे शारीरिक, मानसिक आरोग्य ढासळते आणि रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. ज्या लोकांना व्यसनाची समस्या आहे त्यांना व्यावसायिक मदतीची आवश्यकता आहे. विशेषतः जेव्हा त्यांचा मूड चांगला नाही किंवा तणावग्रस्त विचार मनात आहेत.

एखाद्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला, त्यांची योग्य रीतीने काळजी घेणे आवश्यक आहे. अशा संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शारीरिक अंतर राखून स्वतःला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. मात्र यासाठी त्या व्यक्तीला सामाजिकदृष्ट्या दूर लोटण्याची आवश्यकता नाही. जर एखाद्याला अशी व्यक्ती माहीत आहे जिला कदाचित संसर्ग होण्याची शक्यता आहे, आवश्यक असल्यास त्यांना सावधगिरीविषयी माहिती द्यावी. त्याचप्रमाणे, वैद्यकीय मदत कशी घ्यावी याचीही माहिती द्यावी.

जर एखाद्या व्यक्तीमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली तर घाबरुन जाण्याचे कारण नाही. स्वतःला वेगळे ठेवणे आणि सुचविण्यात आलेली औषधे घेतल्यास लवकरात लवकर बरे होण्यास मदत होईल.

रोगातून बरे झाल्यानंतर भावनांचे व्यवस्थापन कसे करावे?

कोविड संसर्गातून बरे होण्याची भावना अप्रतिम आहे. मात्र, बरे झाल्यानंतर एखाद्याला तणाव येऊ शकते आणि आपल्या समाजात परतण्याची इच्छा होऊ शकते. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती आजारी पडते, तेव्हा काळजी वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, आजाराबाबत नीटशी माहिती नसलेल्या व्यक्तींकडून आजारी व्यक्तीपासून अंतर राखले जाऊ शकते. अशावेळी ती आजारी व्यक्तीदेखील तणावग्रस्त आणि समाजापासून लांब असते. अशा परिस्थितीत, संयम ठेवणे आणि इतरांची काळजी घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

अपराधीपणाच्या भावनेतून एखाद्या व्यक्तीमध्ये नैराश्य, असहाय्यता किंवा वैफल्य निर्माण होऊ शकते. संसर्गातून बऱ्या झालेल्या प्रकरणांविषयी माहितीची देवाणघेवाण केल्यास इतरांना दिलासा मिळू शकतो.

तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्याच्या समस्या या तुमच्याच समस्या आहेत अशी जाणीव असणे आवश्यक आहे आणि काळाची गरज आहे. जर इतरांना झोपेच्या पद्धतीत बदल जाणवत आहेत, झोप किंवा एकाग्रतेत अडचणी येत आहेत, आरोग्याच्या समस्या बिकट होत आहेत आणि मद्य, तंबाखू किंवा ड्रग्सचे सेवन वाढण्याची समस्या जाणवत असेल तर अशा व्यक्तींविषयी संवेदनशील राहून सहानुभुती राखणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीस आधार देणे आणि डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य व्यावसायिकाचा हेल्पलाईन क्रमांकाची (080- 46110007) माहिती देणे मोठे मदतकार्य ठरु शकते.

सेल्फ-आयसोलेशनमध्ये आव्हानांचा सामना कसा कराल?

ज्या लोकांना पुर्वीपासून मानसिक आजारांची समस्या आहे त्यांना सेल्फ-आयसोलेशन किंवा कोविड संसर्गामुळे नव्या आव्हानांचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. इतरांप्रमाणेच भीती आणि तणाव त्यांना असू शकतो. मात्र, यामुळे त्यांच्या पुर्वीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सोशल आयसोलेशनमुळे त्यांना इतरांपासून अधिक दूर गेल्यासारखे, मूडी आणि चिडचिडेपणा वाटू शकतो.

जर त्या व्यक्तीला औषधे किंवा समुपदेशनाची सुविधा सहजपणे उपलब्ध नसेल, त्यांना मदत आणि आधाराची अत्यंत आवश्यकता आहे. दररोज निर्धारित औषधे घेणे तसेच दैनंदिन नित्यक्रम सांभाळणे, स्वतःला व्यस्त आणि सकारात्मक ठेवणेदेखील फायदेशीर ठरेल. याशिवाय, आरोग्य हेल्पलाईन्समुळे त्यांना मदत मिळू शकते.

लक्षात ठेवा, कठीण परिस्थितीत असलेली सुदृढ मानसिक स्थिती तुम्हाला युद्धात सहजपणे विजय मिळवून देऊ शकते!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.